Sangli News Saam tv
महाराष्ट्र

Sangli News : विटामधून १४ किलो गांजा जप्त; कारवाई करत पोलिसांनी दोघांना घेतले ताब्यात

Sangli vita News : गुन्हे प्रकटीकरण पथक विटा पोलीस ठाणे हद्दीमध्ये पेट्रोलिंग करीत असताना पोलिस कॉन्स्टेबल महेश संकपाळ यांना विटा ते मायणी जाणाऱ्या रोडवर पवई टेकाजवळ एकजण गांजा विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली होती

विजय पाटील

सांगली : बंदी असताना देखील गांजा विक्री केली जात असल्याचे वारंवार समोर आले आहे. यातच सांगलीच्या विटा येथे मायणी रोड परिसरात गांजा विक्रीसाठी आलेल्या दोघा तरूणांना विटा पोलिसांनी अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून १ लाख ९५ हजार किंमतीचा सुमारे १४ किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. 

राहुल देवकुळे आणि महावीर चव्हाण असे गांजा विक्री करणाऱ्या तरुणांची नावे आहेत. गुन्हे प्रकटीकरण पथक विटा पोलीस ठाणे हद्दीमध्ये पेट्रोलिंग करीत असताना पोलिस कॉन्स्टेबल महेश संकपाळ यांना विटा ते मायणी जाणाऱ्या रोडवर पवई टेकाजवळ एकजण गांजा विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचत सदर ठिकाणी छापा टाकला असता एक युवक त्याच्या ताब्यातील मोटारसायकल व एक काळ्या रंगाची बॅग पाठीवर अडकवून उभा असलेला सापडला. 

घरातही सापडला गांजा 

पोलिसांनी या तरुणाची चौकशी करत त्याची झडती घेतली असता राहुल संदिपान देवकुळे (रा. पळशी ता. माण) याच्या ताब्यातील बॅगची तपासणी केली असता उग्र वासाचा ४ किलो तयार गांजा सापडला. विटा उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील व पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांनी त्याठिकाणी तातडीने भेट देऊन राहुल देवकुळे यास अटक करण्यात आली आहे. तसचे त्याचे पोलीस कस्टडी रिमांडमध्ये त्याचे घराची झडती घेतली असता त्याच्या घरात ४ किलो गांजा सापडला. 

१ लाख ९५ हजाराचा मुद्देमाल हस्तगत 

पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या राहुल त्याच्याकडे अधिक तपास करून त्याचा साथीदार महावीर चव्हाण (रा. लोणंद ता. माळशिरस) यास देखील ताब्यात घेतले. यानंतर त्याच्या घराची तपासणी केली असता तेथे ६ किलो गांजा; असा एकुण १४ किलो उग्र वासाचा गांजा व मोटारसायकल असा एकूण १ लाख ९५ हजार रुपये  किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक जालींदर पळे करीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monday Horoscope : दिवसभरात मोठा निर्णय घेणे टाळा, मनातील इच्छा पूर्ण होतील; ५ राशींच्या लोकांची स्वप्न होणार पूर्ण

Crime: विवाहित महिलेवर सामूहिक बलात्कार, गॅस सिलिंडर देतो म्हणत सोबत नेलं; अत्याचार करत व्हिडीओ काढले अन्...

शौर्यगाथा कार्यक्रमावरून राजकारण तापलं; मनसे नेते राजू पाटील यांचा भाजपवर जोरदार निशाणा

LPG Rule Change: मोठी बातमी! सर्वसामान्यांना मोठा झटका, गॅस सिलिंडरच्या नियमात बदल

मातृदिनी आई हळहळली! तुळजापुरात 19 वर्षीय तरुणाची हत्या|VIDEO

SCROLL FOR NEXT