Miraj News Saam tv
महाराष्ट्र

Miraj News : नशेसाठी औषधांची विक्री करणारी टोळी ताब्यात; इंजेक्शन व गोळ्यांसह साडेचौदा लाखांचा साठा जप्त

Sangli News : औषधी, इंजेक्शन यासह पंक्चर जोडण्याचे सोलेशन, व्हाईटनर यासारख्या साहित्याचा वापर करून नशा करत असतात. मिरजमध्ये औषधी व इंजेक्शनच्या माध्यमातून नशा करण्यात येत असल्याचा प्रकार समोर आला

विजय पाटील

सांगली : नशेसाठी औषधांचा वापर करण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार सांगलीच्या मिरजेमध्ये उघडकीस आला आहे. या औषधी, गोळ्या विक्री करणारी एक टोळी सक्रिय झाली होती. याबाबत पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी टोळीतील तीन जणांना ताब्यात घेतले आहे. तसेच त्यांच्याकडून सुमारे १४ लाख ५० हजाराचा औषधांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. 

औषधी, इंजेक्शन यासह पंक्चर जोडण्याचे सोलेशन, व्हाईटनर यासारख्या साहित्याचा वापर करून अनेकजण नशा करत असतात. प्रामुख्याने सांगली जिल्ह्यातील मिरजमध्ये औषधी व इंजेक्शनच्या माध्यमातून नशा करण्यात येत असल्याचा प्रकार समोर आला आहे. नशेखोराना औषधी पुरवठा करणारी एक टोळी देखील सक्रिय झाली होती. याबाबत पोलिसांनी माहिती मिळाली होती. 

तिघांना घेतले ताब्यात 

मिरज शहरामध्ये नशेसाठी वैद्यकीय औषधांचा अवैधरित्या वापर करण्यात येत असल्याचा प्रकार सुरू होता. याबाबत पोलिसांना मिळालेल्या माहितीवरून या प्रकरणी महात्मा गांधी चौकी पोलिसांनी सापळा रचून नशेसाठी मेफेनटमाईन इंजेक्शन व गोळ्या विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. यामध्ये तीन जण औषधी घेऊन आल्याचे निदर्शनास आले. औषधी पुरवठा करणाऱ्या या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 

साडेचौदा लाखाचा मुद्देमाल जप्त 

मिरजेच्या महात्मा गांधी चौकी पोलिसांनी तिघांना ताब्यात घेत नशेसाठी वापरण्यात येणाऱ्या औषधी इंजेक्शन व गोळ्यांचा साठा जप्त केला आहे. यात टोळीकडून ६ लाख किंमतीचा १ हजार ५०७ इंजेक्शन बाटल्या व गोळ्यांचा साठा जप्त करण्यात आला आहे. यासह त्यांच्याकडून साडे चौदा लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी पुढील तपास पोलिसांकडून सुरु आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी बातमी! मनोज जरांगे यांचे उपोषण स्थगित; राज्य सरकारकडून सर्व मागण्या मान्य

Maharashtra News Live Update: पनवेलमध्ये ऑनलाईन सट्टेबाजी रॅकेटवर पोलिसांचा छापा

मोठी दुर्घटना! पाच मजली इमारत कोसळली; सिमेंटच्या ढिगाऱ्याखाली अनेकजण दबल्याची भीती

अजित पवार गटाच्या नेत्याकडून महिलेचा विनयभंग; विधवेकडे नगरसेवकानं केली शरीरसुखाची मागणी

सासूसाठी सुनबाई बिबट्याशी भिडली, संकटात नातूनेही दाखवलं धाडस

SCROLL FOR NEXT