Breaking News : सावकारी करणे पितापुत्राला पडले महागात! SaamTv
महाराष्ट्र

Breaking Sangli : सावकारी करणे पितापुत्राला पडले महागात!

सांगलीच्या मिरज तालुक्यातील म्हैसाळ येथील एकास 30 लाखाचे सावकारी कर्ज देऊन त्या मोबदल्यात 7 टक्के व्याजाने महिन्याला 2 लाख रुपये घेतले.

विजय पाटील

सांगली : सांगलीच्या मिरज तालुक्यातील म्हैसाळ येथील एकास 30 लाखाचे सावकारी कर्ज देऊन त्या मोबदल्यात 7 टक्के व्याजाने महिन्याला 2 लाख रुपये घेतले. 61 लाखाची वसुली केल्यानंतर देखील आणखी 50 लाख आणि प्लॉट नावावर करण्यासाठी धमकावल्याने पोलिसांनी सावकार शैलेश रामचंद्र धुमाळ आणि त्यांचा मुलगा आशिष शैलेश धुमाळ यांच्या घरावर छापा टाकून त्यांना अटक केली आहे.

हे देखील पहा -

धुमाळ पितापुत्रांनी म्हैसाळ येथील अशोक कोरवी यांना 30 लाखाचा धनादेश दिला होता. त्या बदल्यात महिन्याला 7 टक्के व्याजाने 2 लाख 10 हजार रुपये वसूल केले होते. तसेच स्थानिक कर्जदार म्हणून महिन्याला आणखी 2 लाख रुपयांची मागणी करून 25 लाख रुपयांचा धनादेश घेतला होता. 30 लाख रुपयांच्या कर्जापोटी 61 लाख रुपयांची वसुली करून देखील धुमाळ पितापुत्रांकडून कोरवी यांना धमकावून त्यांच्याकडे आणखी 50 लाखाची मागणी करून त्यांचा म्हैसाळ येथील 13 गुंठ्याचा प्लॉट नावावर करण्यासाठी तगादा लावला होता.

त्यामुळे कोरवी यांनी सावकारी सेलकडे तक्रार केली होती. त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पथक तयार करून त्यांच्या घरावर छापा टाकण्यात आला. यावेळी 2 लाख 60 हजार रोख रक्कम, कोरे धनादेश आणि वाहने जप्त करण्यात आली. याबाबत मिरज ग्रामीण पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

जिम की योगा; वजन कमी करण्यासाठी काय आहे बेस्ट?

Ration Card New Rule: अंत्योदय अन्न योजनेत मोठा बदल; आता रेशनकार्डवर नाव असलेल्या प्रत्येक व्यक्तीला मिळेल ७ किलो धान्य

Kalyan : बुद्धभूमी फाउंडेशनच्या जागेप्रकरणी विधानसभेतील माहिती दिशाभूल करणारी; महाथेरो गौतम रत्न यांचा आरोप

Badlapur Crime: बदलापूर हादरले! अनैतिक संबंधावरून कडाक्याचं भांडण, नवऱ्याकडून बायकोची नाक-तोंड दाबून हत्या

मालदिवपेक्षाही सुंदर! भारतातील 'हे' ठिकाण

SCROLL FOR NEXT