Sangli Market Committee Election Result saam tv
महाराष्ट्र

Sangli Market Committee Election Result : भाजपला दणका; सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीत महाविकास निर्विवाद सत्ता

या निकालामुळे मविआचे सांगली जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील पुन्हा एकदा वर्चस्व सिद्ध झाले.

विजय पाटील

Sangli Krushi Utpanna Bazar Samiti Result : देशातील अग्रगण्य बाजार समिती मानल्या जाणाऱ्या सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूकीत महाविकास आघाडीने निर्विवाद सत्ता मिळवली आहे. या निवडणूकीत विराेधी भाजपाच्या गटास एकही जागा मिळवता आलेली नाही. (Breaking Marathi News)

या निवडणुकीत भाजपाचे कामगार मंत्री सुरेश खाडे (suresh khade), खासदार संजयकाका पाटील (mp sanjaykaka patil) ,माजी आमदार विलासराव जगताप (vilasrao jagtap) यांनी मविआच्या नेत्यांपुढे आव्हान उभे केले हाेते.

मतदारांनी राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (jayant patil) माजी मंत्री विश्वजीत कदम (vishwajeet kadam), काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील (vishal patil), माजी मंत्री अजित घोरपडे (ajit ghorpade) यांचे नेतृत्व स्विकारात महाविकास आघाडीला निवडणूकीत दणदणीत विजय मिळवून दिला आहे.

सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूकीत 18 पैकी 17 जागांवर महाआघाडीच्या उमेदवारांचा दणदणीत विजय झाला आहे. तसेच एका जागेवर व्यापारी गटातून अपक्ष उमेदवार विजयी झाला आहे. या निवडणुकीच्या निकालानंतर मविआच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लाेष केला.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Best Bus Strike: अखेर तोडगा निघालाच! बेस्टचा संप मागे, कर्मचाऱ्यांना मिळणार २००० रुपये मासिक हंगामी वाढ

ओमराजे निंबाळकरांचं अखेर ठरलं! ठाकरेंच्या मनधरणीच्या प्रयत्नांना अपयश

मुलीला वाचवण्यासाठी बाप बिबट्याशी भिडला; मृत्यूच्या जबड्यातून चिमुकलीची सुटका

अमिताभ बच्चन यांची लेक संजय राऊतांची फॅन; खुद्द जया बच्चन यांचा खुलासा

Beed Crime: बीड हादरले! तरूणावर चाकूने सपासप वार, हॉटेलबाहेर जागीच संपवलं

SCROLL FOR NEXT