Sangli , LCB, inamdhamni, arrest, husband, wife, relative saam tv
महाराष्ट्र

Crime News : नातेवाईकाच्या घरातून पाच लाख चाेरले; एलसीबीच्या जाळ्यात सापडलं दाम्पत्य

पाेलिसांनी तब्बल पाच लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला.

विजय पाटील

Sangli Crime News : पती-पत्नीनं आपल्याच नातेवाईकाच्या घरात चाेरी केल्याची घटना सांगली जिल्ह्यात समाेर आली आहे. या प्रकरणी एलसीबीनं (lcb) कसून तपास करुन दाेघांना अटक (arrest) केली आहे. (Sangli Latest Marathi News)

एका चोरीतला मुद्देमाल घेऊन नवरा-बायकाे सांगली शहरा नजीकच्या इनामधामणी येथून पसार होणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला मिळाली होती. त्यानुसार पथकाने इनामधामणी येथील शांतीबन चौकात थांबलेल्या दोघांना ताब्यात घेऊन झडती घेतली. (Maharashtra News)

त्यांच्याकडे रोकड आणि सोन्याचे दागिने आढळुन आले. या दोघांना पाेलिसी खाक्या दाखविताच हे पैसे युनूस नदाफ या नातेवाईकाच्या घरातून चोरून आणल्याचे त्यांनी कबूल केले. सुभानअल्ला नदाफ आणि त्याची पत्नी मोबीना नदाफ या दोघांना एलसीबीनं अटक केली.

पाेलिसांनी त्यांच्याकडील तीन लाख 85 हजार रुपयांची रोकड आणि एक लाख 32 हजार किंमतीचे सोन्याचे दागिने हस्तगत केले. मोबीना नदाफ हिनेचोरीच्या पैशातून एक लाख 32 हजार किमतीचे सोन्याचे दागिने खरेदी केल्याचेही पाेलिसांना सांगितलं. (Breaking Marathi News)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

लाल, पिवळी की हिरवी? वटपौर्णिमेला कोणत्या रंगाची साडी नेसणं शुभ

Maharashtra News Live Update: नसरापूर बलात्कार हत्या प्रकरणात आरोपी भिमराव कांबळेला मृत्युदंड देण्याची न्यायाधीशांकडे मागणी

Nasrapur Case Verdict : नसरापूर अत्याचार प्रकरणात कोर्टाने दिला निकाल, नराधम भीमराव कांबळे अखेर दोषी

Nasrapur Case : नसरापूरच्या नरकासुरला फाशी की जन्मठेप? न्यायालयाच्या निकालाकडे राज्याचे लक्ष, घटनेची A to Z टाईमलाईन

Mawa kachori: घराच्या घरी कशी तयार कराल राजस्थानची मावा कचौरी?

SCROLL FOR NEXT