sangli, lcb, sindhudurg, whale vomit saam tv
महाराष्ट्र

Sangli LCB ची धडाकेबाज कारवाई, पावणे सहा कोटींची व्हेल माशाची उलटी जप्त; सिंधुदुर्ग, सांगलीतील युवकांना अटक

पाेलिस या टाेळीत आणखी काही जण आहेत का याचा तपास करीत आहेत.

विजय पाटील

Whale Vomit : व्हेल माशाच्या उलटीची तस्करी करणाऱ्या टोळीला सांगलीच्या (sangli) स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने (Local Crime Branch) जेरबंद (arrests) केले आहे. या प्रकरणी पाेलिसांनी (police) दोघांना अटक केली आहे. त्यांच्याकडून तब्बल पावणे सहा कोटींच्या व्हेल माशाची उलटी पदार्थ जप्त करण्यात आला आहे.

सांगली शहरातल्या शामराव नगर जवळील एपीजे अब्दुल कॉलेज जवळ बंदी असलेल्या व्हेल माशाची उलटीची विक्री करण्यासाठी काही व्यक्ती येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला मिळाली होती. त्यानुसार सापळा रचून दोघा संशयितांना ताब्यात घेऊन त्यांची अंगझडती घेण्यात आली.

त्यांच्याजवळ व्हेल माशाची पाच किलो वजनाची उलटी आढळून आली. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये याची सुमारे पाच कोटी 71 लाख इतकी किंमत आहे. हा पदार्थ जप्त करत या प्रकरणी सांगलीत राहणा-या सलीम पटेल त्याचबरोबर सिंधुदुर्गहून (sindhudurg) उलटी पदार्थ विक्री करण्यासाठी आलेल्या अकबर शेख या दोघांना अटक करण्यात आली आहे.

सांगली शहर पोलीस ठाण्यात दोघां विरोधात गुन्हा दाखल झाला. अधिक तपास शहर पोलीस करत आहेत अशी माहिती कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी दिली आहे. (Maharashtra News)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident : सण साजरा करायला गेलेले परतलेच नाही! २४ तासांत ४९ जणांचा मृत्यू; भीषण घटनांनी देश हादरला

Gold Price Today : सोन्याच्या दरात मोठी घसरण! आठवडाभरात सोनं किती रुपयांनी स्वस्त; वाचा १८, २२ आणि २४ कॅरेटचे दर

Sanjay Raut : राज्यावर ११ लाख कोटींचं कर्ज, संजय राऊतांची सरकारवर जोरदार टीका

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा; भाजपाच्या नेत्याकडून ५१ टन चारा वाटप, सोलापुरात आदर्श उपक्रम

Maharashtra News Live Update: नागपूर पदवीधर निवडणुकीसाठी भाजपने कंबर कसली - देवेंद्र फडणवीस

SCROLL FOR NEXT