Sangli Crime x
महाराष्ट्र

Sangli Crime : लग्नाला १७ दिवस झाले, वटपौर्णिमेच्या दिवशीच बायकोनं घात केला, आधी कुऱ्हाडीने वार नंतर...; नवऱ्याला क्रूरपणे संपवलं

Sangli Crime News : सांगलीत वटपौर्णिमेच्या रात्रीच्या एका व्यक्तीवर त्याच्या दुसऱ्या बायकोने प्राणघातक हल्ला केला. कुऱ्हाडीने त्याच्या डोक्यावर, शरीरावर वार केले. या हल्ल्यात व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला.

Yash Shirke

विजय पाटील, साम टीव्ही, प्रतिनिधी

सांगलीच्या कुपवाडमधील प्रकाशनगरमध्ये धक्कादायक प्रकार घडला. लग्नाच्या सतरा दिवसांतच एका महिलेने तिच्या नवऱ्याचा जीव घेतला. वटपौर्णिमेच्या रात्री आरोपी महिलेने तिच्या नवऱ्यावर कुऱ्हाडीने वार केले. हल्ल्यात महिलेचा नवरा जागीच ठार झाला. या घटनेमुळे आसपासच्या परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सांगलीतील कुपवाडच्या प्रकाशनगरमधील एकता कॉलनीत अनिल तानाजी लोखंडे (वय ४५) याची हत्या झाली. वटपौर्णिमेच्या रात्री साडेअकरा ते साडेबाराच्या सुमारास अनिलच्या बायकोने त्याच्यावर प्राणघातक हल्ला केला. डोक्यावर कुऱ्हाडीचा वार झाल्याने अनिल लोखंडेचा जागीच मृत्यू झाला. अनिलचे सतरा दिवसांपूर्वी दुसरे लग्न झाले होते.

अनिल लोखंडे यांची पहिल्या बायकोचा कर्करोगाने मृत्यू झाला होता. अनिलला दोन मुली आहेत. त्या दोन्ही मुलींच्या लग्नानंतर अनिल एकटाच घरी राहत होता. पोटाचे हाल होत असल्याने नातेवाईकांनी त्याचे दुसरे लग्न लावून दिले. सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्याच्या वडी गावातील राधिका इंगळे या २७ वर्षीय तरुणीशी अनिलचे दुसरे लग्न लावून दिले.

१७ मे २०२५ रोजी अनिल आणि राधिका यांचे लग्न झाले होते. पण लग्नानंतर अवघ्या १७ दिवसांनी वटपौर्णिमेच्या रात्री राधिकाने अनिलच्या डोक्यावर, हातावर कुऱ्हाडीने वार केला. प्राणघातक हल्ल्यात अनिलचा जीव गेला. घटनेची माहिती मिळताच कुपवाड औद्योगिक वसाहत पोलिसांनी आरोपी राधिकाला ताब्यात घेतले. राधिकाने अनिलची हत्या का केली यामागील कारणाचा शोध पोलीस घेत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Lucky Mobile Number : मोबाईल नंबर तुम्हाला बनवेल लखपती? जाणून घ्या शेवटच्या Lucky अंकाचा खेळ

Maharashtra News Live Update: अल निनोमुळे राज्यात पाणी टंचाईची भीषण समस्या

Mumbai Toll: मुंबईकरांचा प्रवास महागला, टोलच्या दरात मोठी वाढ; नवे दर किती?

Walking Benefits: १० मिनिटं की ६० मिनिटं; दररोज किती चाललं पाहिजे? तुमच्या आरोग्यासाठी दोघांपैकी काय ठरेल फायदेशीर?

Accident News : भाजपच्या बड्या नेत्याच्या कारचा भीषण अपघात! भरधाव ट्रेलरने दिली जोरदार धडक

SCROLL FOR NEXT