Sangli Jail Clash News Saam Tv
महाराष्ट्र

Sangli : सांगली कारागृहात राडा! १६ जणांकडून दोन कैद्यांवर जीवघेणा हल्ला, लाथाबुक्क्या अन् विटा डोक्यात घातल्या

Sangli Jail Clash News : सांगली कारागृहात दोन टोळ्यांमध्ये राडा झाला असून १६ कैद्यांनी दोन सराईत गुन्हेगारांना विटांनी बेदम मारहाण केली. या घटनेमुळे जेल सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Alisha Khedekar

  • सांगली कारागृहात दोन टोळ्यांमध्ये गँगवार

  • १६ कैद्यांकडून दोघांना विटांनी मारहाण

  • दोन जखमी

  • कारागृहात गोंधळ

विजय पाटील, सांगली

सांगलीतील कारागृहात दोन टोळ्यांमध्ये जोरदार राडा झाला असल्याची बातमी समोर आली आहे. दोन सराईत गुन्हेगारांना १६ जणांच्या टोळीने बेदम मारहाण केली. यावेळी विटांनी केलेल्या मारहाणीत दोघे जखमी झाले आहेत. कारागृहातील खुल्या मैदानात हा प्रकार घडल्याने एकाच गोंधळ उडाला होता. दरम्यान कारागृहातील कैद्यांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जखमी गुंड पवन साळुंखे हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर जिल्हाधिकार्‍यांनी एमपीडीए अंतर्गत कारवाई करून एक वर्षासाठी स्थानबद्ध केले आहे. तर त्याचा साथीदार मेघशाम उर्फ मोठ्या जाधव हा देखील सराईत गुन्हेगार आहे. त्यामुळे दोघांना बेगळ्या बरॅकमध्ये ठेवण्यात आले आहे.

दरम्यान, या दोघांचे कट्टर विरोधक असणारा आदित्य पवार याच्यासह १६ जण वेगवेगळ्या गुन्ह्यात सांगली कारागृहात वेगळ्या बरॅकमध्ये आहेत. दोन्ही टोळींना कारागृहातील खुल्या मैदानात आणण्यात आले होते. यावेळी दोन्ही टोळी समोरासमोर आले. १६ जणांच्या टोळीने गुंड पवन साळुंखे आणि मेघशाम उर्फ मोठ्या जाधव या दोघांना तुम्हाला वेगळ्या बरॅकमध्ये ठेवले आहे. म्हणून स्वत:ला शहाणे समजता का? असे म्हटले.

त्यामुळे दोन्ही टोळीत खटका उडाला. दोन्ही टोळीत जोरदार वादावादीचा प्रकार घडला. त्यानंतर गुन्हेगार आदित्य पवार याने या दोघांना मारा असे त्याच्या टोळीला सांगितले. यानंतर या दोघांनी पलायन करण्याचा प्रयत्न केला. मात्र १६ जणांनी त्यांचा पाठलाग करून विटांनी बेदम मारहाण केली. यामध्ये दोघे जखमी झालेत. या घटनेमुळे मात्र सांगली कारागृहात एकच गोंधळ उडाला होता. याबाबत सांगली शहर पोलिस अधिकचा तपास करीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chapati Tips : रात्री पीठ मळून फ्रिजमध्ये ठेवता? ही १ चूक पडू शकते महागात

Maharashtra News Live Update: जालना जिल्ह्यात हैदराबाद गॅझेटनुसार 421 अर्जापैकी 377 प्रमाणपत्र वितरित

Friday Horoscope: आर्थिक लाभ, प्रेमाची कबुली; या ६ राशीच्या लोकांना मिळणार आनंदाची बातमी, वाचा शुक्रवारचं राशीभविष्य

गणपतीत 5 दिवस नक्की खा या 5 गावरान भाज्या; ज्या चवीसोबतच आरोग्यासाठीही आहेत वरदान!

Success Story: डोंबिवलीच्या अदितीची आकाशाला गवसणी! १६ लघुग्रहांचा शोध, नासाने घेतली ३ ग्रहांची दखल

SCROLL FOR NEXT