आंतरराज्यीय टोळी विजय पाटील
महाराष्ट्र

सांगली: घरफोडी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश! (पहा Video)

दुचाकीवरून घरफोडी करणारी आंतरराज्यीय चोरट्यांची टोळी पकडण्यात सांगलीच्या विटा पोलिसांना यश आले आहे.

विजय पाटील साम टीव्ही सांगली

विजय पाटील

सांगली : दुचाकीवरून घरफोडी करणारी आंतरराज्यीय चोरट्यांची टोळी पकडण्यात सांगलीच्या विटा पोलिसांना यश आले आहे. ही टोळी पुणे जिल्ह्यातील  कुसेगाव येथील आहे. आतापर्यंत या चोरट्यांकडून तीन घरफोड्यांमधील एकूण पावणे १४ लाखांहून अधिक रकमेचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. या प्रकरणी योगेश रमेश नानावत धंदा हातभट्टी या चोरट्यास अटक केली असून इतर आदित्य बलराम शेखावत, करण भगत शेखावत आणि अरुण केरा राठोड तिघे पळून गेले आहेत. (Sangli News)

गेल्या अनेक दिवसांपासून खानापूर तालुक्यात चोऱ्या आणि घरफोड्यांच्या प्रकारात वाढ झाली होती. या बाबत विटा पोलिस सतर्क राहून गस्त वाढवली होती. या पार्श्वभूमीवर 2 फेब्रुवारीच्या मध्यरात्री तालुक्यातील चिखलहोळ येथील शिक्षक अर्जुन गिरी यांच्यात मोठी चोरी झाली. या चोरीचा तपास सुरू असताना संशयित योगेश नानावत हा विट्याचे पोलीस पथकाला गस्त घालत असताना संशयितरित्या फिरत असताना सापडला. त्‍यानंतर त्‍याला पकडून त्याच्याकडे कसून चौकशी केली असता, त्याच्या बरोबर त्याचे साथीदार आदित्य शेखावत, करण शेखावत आणि अरुण राठोड या ठिकाणी रेसर बाईक गाड्यांवर इतरत्र जाऊन घरफोड्या केल्या आहेत. अशी कबुली दिली.

पहा व्हिडीओ-

यावेळी योगेश नानावत याने त्याच्या या साथीदारांबरोबर चिखलहोळ बरोबरच रेणावी येथील अनिता गुजले यांच्या घरात २७ डिसेंबर २०२१ रोजी घरफोडी केली होती आणि वाळूज येथील राजेंद्र मुरलीधर बाबर यांच्या घरात १ जुलै २०२१ रोजी घरफोडी केल्याची कबुली दिली आहे. याप्रकरणी या चोरट्यांकडून गुन्ह्यात वापरण्यात आलेल्या दोन रेसर बाईक एक पल्सर गाडी आणि निळ्या रंगाची यामाहा गाडी ही पोलिसांकडून जप्त करण्यात आली आहे. याशिवाय या चोरट्यांकडून एकूण २२८ ग्रॅम सोने, २ हजार ०४० ग्रॅम चांदीही हस्तगत करण्यात आलेली आहे. त्यामुळे रेसर बाईक अर्थात दुचाकीवरून घरफोड्या करून पळून जाणारी पुणे जिल्ह्यातील आंतरराज्यीय चोरट्यांच्या टोळीचा विटा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या संशयितांच्याकडून आणखीही घरफोड्या उघडकीस येण्याची शक्यता असल्याचे पोलीस निरीक्षक संतोष डोके यांनी सांगितले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Junnar ST Bus Accident: गुंजाळवाडीजवळ शेगाव-कल्याण एसटीचा भीषण अपघात; दोन ते तीनवेळा उलटली बस, दोघांचा मृत्यू, १७ जखमी

चित्रपटसृष्टी हादरली! प्रसिद्ध दिग्दर्शकाची आत्महत्या; नदीमध्ये सापडला मृतदेह

Mumbai Accident: मुंबईत अपघाताचा थरार! सिमेंट मिक्सरने दोघांना चिरडलं, वडिलांच्या डोळ्यासमोर ८ वर्षीय अहानाने सोडले प्राण

Dagdusheth Halwai Ganpati: पुण्याच्या शिरपेचात मानाचा तुरा, दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट’ला 'अ' वर्ग पर्यटन क्षेत्राचा दर्जा

Diesel Crisis: परभणीत डिझेलची टंचाई, पेट्रोल पंपाबाहेर कॅन घेऊन रांगा; पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT