Sangli Saam
महाराष्ट्र

Sangli: चारित्र्यावर संशय अन् संसारात विष! नवऱ्यानं बायकोचे हात - पाय मोडून पेटीत लपवले; मुलाने सांगितलं 'पप्पाच आरोपी'

Husband kills wife over suspicion: चारित्र्याच्या संशयावरून नवऱ्याने गळा आवळून बायकोची निर्घृण हत्या केली आहे. नंतर मृतदेहाचे तुकडे करून एका पेटीत लपवले. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं आहे.

Bhagyashree Kamble

विजय पाटील, साम टीव्ही

चारित्र्याच्या संशयावरून नवऱ्याने गळा आवळून बायकोची निर्घृण हत्या केली आहे. नंतर मृतदेह विद्युत पंपाच्या पेटीत लपवून ठेवलं होतं. अंगावर शहारे आणणारी ही घटना सांगलीच्या शिराळा तालुक्यातील मांगले या गावात घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी कारवाई करत आरोपीला ताब्यात घेतलं आहे.

काही दिवसांपूर्वी मेरठमध्ये अशीच एक घटना घडली होती. बायकोने प्रियकराच्या मदतीने नवऱ्याचा काटा काढला होता. आता अशीच काहीशी घटना सांगलीत घडल्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

प्राजक्ता मंगेश कांबळे(वय वर्ष २८) असे मृत पत्नीचे नाव आहे. मंगेश चंद्रकांत कांबळे असे आरोपी पतीचे नाव आहे. मंगेश आणि प्राजक्ताचा आठ वर्षांपूर्वी आंतरजातीय प्रेम विवाह झाला होता. आरोपी मंगेशचा भाऊ निलेश आणि त्याची आई गेल्या पंधरा वर्षापासून मांगले येथे वास्तव्यास आहेत. मांगले वारणानगर रस्त्यावर ज्योतिबा मंदिरासमोर रामचंद्र वाघ यांच्या घरात ते भाड्याने राहतात.

चार दिवसांपूर्वी मंगेश, त्याची पत्नी प्राजक्ता, सहा वर्षांचा मुलगा शिवम आणि तीन वर्षांची मुलगी शिवन्या मुंबईहून आई आणि भावाकडे राहायला आले होते. २७ मार्चला सकाळी भाऊ निलेश आणि त्याची आई देववाडीला गेले होते. दरम्यान, सकाळी दहाच्या दरम्यान पती-पत्नीमध्ये वाद झाला होता. भांडणाचे रूपांतर हाणामारीत झाले. नंतर मंगेशला राग अनावर झाला. त्याने थेट ओढणीने प्राजक्ताचा गळा आवळला.

प्राजक्ताचा ओढणीने गळा आवळल्यामुळे तिचा जागीच मृत्यू झाला. मृतदेह लपविण्यासाठी त्याने एक शक्कल लढवली. त्याने मृतदेहाचे तुकडे केले. हात - पाय मोडले. बाजूच्या खोलीत ठेवलेल्या विद्युत पंपाच्या मोडक्या पेटीत पत्नीचा मृतदेह ठेवला. खोलीला बाहेरून कुलूप लावून मंगेशने भावाला फोन केला. 'मी शिराळ्याला जाणार आहे. गाडी घेऊन ये', असा त्याने निरोप दिला.

भाऊ घरी आला आणि आरोपी गाडी घेऊन गेला. यादरम्यान, मंगेशचा सहा वर्षांचा मुलगा शिवम दारातच रडत होता. यावेळी निलेशने चिमुकल्याला रडण्याचे कारण विचारले. त्यावेळी चिमुकल्याने, 'आई पप्पांचे भांडण झाले आहे. त्यांनी आईला मारून खोलीत डांबून ठेवल्याचे सांगितले'. त्यानंतर हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला.

या प्रकरणानंतर आरोपीचा भाऊ, बहीण आणि दाजीने मंगेशला झालेल्या प्रकाराबद्दल विचारणा केली. तेव्हा आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली. नंतर स्वत: मंगेश कांबळे शिराळा पोलिसांत हजर झाला. या प्रकरणी पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आहे. त्याची चौकशी करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check: NEETचा पेपर पुन्हा फुटला? टेलिग्रामवरून NEETची प्रश्नपत्रिका व्हायरल?

बेस्टचा संप, रिक्षाचालकांकडून लूट, सामच्या स्टिंगमध्ये लुटीचा पर्दाफाश

उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का बसणार? ठाकरेसेनेचे 14 आमदार फूटणार; राजकारणात खळबळ

ओमराजे फुटले, 15 हजार फॉलोअर्स घटले, सोशल मीडियावर ओमराजेंविरोधात संताप

फुलांच्या वर्षावात, राजाभाऊ नाशकात, कोट्यवधींची ऑफर धुडकावणारे राजाभाऊ, ठाकरेंच्या निष्ठावानानं फोडलं ऑपरेशन टायगरचं बिंग

SCROLL FOR NEXT