sangli, swine flu saam tv
महाराष्ट्र

Sangli Swine Flu : सांगलीकरांनाे घाबरु नका ! स्वाइन फ्लूवर नियंत्रणासाठी आराेग्य विभाग सज्ज

सर्व शासकीय आरोग्य संस्थेमध्ये स्वाईन फ्लू बाधित रुग्णावर प्रभावी उपचारासाठी प्रतिबंधक औषधाचा पुरेसा साठा उपलब्ध केला आहे.

विजय पाटील

Sangli Swine Flu : सांगली जिल्ह्यात स्वाईन फ्लूचे सात रुग्ण आढळले आहेत. यातील तिघांचा मृत्यू झाला आहे. यामुळं आरोग्य (health) यंत्रणा युद्ध पातळीवर कामाला लागली आहे. स्वाइन फ्लूवर नियंत्रण ठेवण्यासाठी 88 पथकांची स्थापना करण्यात आली आहे अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुड्डी आणि जिल्हा आरोग्य अधिकारी दिलीप माने यांनी दिली.

जिल्ह्यात स्वाईन फ्लूचे सात रुग्ण आढळल्यामुळे आरोग्य विभागाची विभागाने तातडीने ऑनलाईन बैठक घेतली. यामध्ये तालुका आरोग्य अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी तसेच जिल्हास्तरीय स्तरावरील पर्यवेक्षक बैठकीत सहभागी झाले होते.

स्वाइन फ्लूवर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हास्तरावर पाच, तालुकास्तरावर दहा, प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर 64 आणि महापालिका क्षेत्रात नऊ अशी एकूण 88 पथकाची स्थापना करण्यात आली आहे. स्वाइन फ्लूचे रुग्ण आढळलेल्या भागात सर्वेक्षण करून आढळून येणाऱ्या रुग्णांचे स्क्रीनिंग करून उपचार करण्यात येत आहेत.

सर्व शासकीय आरोग्य संस्थेमध्ये स्वाईन फ्लू बाधित रुग्णावर प्रभावी उपचारासाठी प्रतिबंधक औषधाचा (medicine) पुरेसा साठा उपलब्ध केला आहे. तसेच स्वाइन फ्लू बाबत प्रबोधनही केले जात आहे असेही अधिका-यांनी नमूद केले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sitafal khanyache Fayde: सिताफळ खाण्याचे 7 आरोग्यदायी फायदे कोणते?

Aadhaar Card Update : आधार कार्डवर नाव किंवा आडनाव बदलायचे आहे? UIDAI ची ही सोपी प्रक्रिया जाणून घ्या

Sleep Problems: रात्री गाढ झोप लागत नाही? 'या' ७ कारणांमुळे होऊ शकते झोप खराब; जाणून घ्या उपाय

Maharashtra News Live Update: फ्लाय ९१ ची नवी मुंबईतून सिंधुदुर्ग विमानसेवा सुरू

Vande Bharat Train: मुंबई- बंगळुरू वंदे भारत स्लीपर ट्रेन कधी सुरू होणार? प्रवासाचे ८ तास वाचणार; वेळापत्रक अन् थांबे कोणते?

SCROLL FOR NEXT