Sangli Flood News Saam Digital
महाराष्ट्र

Sangli Flood News : सुरक्षित ठिकाणी जा, मागे राहण्याचं धाडस करू नका! सांगलीत पुराचा धोका वाढताच माजी पालकमंत्र्यांचं आवाहन

Sangli Rain News/Krishna, Warna River Water Lavel : सांगली जिल्ह्यात सध्या मूसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे कृष्णा आणि वारणा नद्यांच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन माजी पालकमंत्री जयंत पाटील यांनी केलं आहे.

Sandeep Gawade

कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात सध्या मूसळधार पाऊस सुरू आहे. बहुतेक सर्व धरणं पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे धरणांमुधून पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू आहे. त्यामुळे जिल्ह्यातील संभाव्य पूरस्थिती लक्षात घेता नागरिकांना सावध राहण्याचं आणि काळजी घेण्याचं आवाहन माजी पालकमंत्री जयंत पाटील यांनी केलं आहे. धोका पातळीच्या परिसरातील नागरिकांनी सुरक्षितस्थळी जावं, कोणीही मागे राहण्याचं धाडस करून नये असंही त्यांनी म्हटलं आहे.

जिल्ह्यातील सध्याच्या पूरस्थितीची माहिती देताना जयंत पाटील म्हणाले की, सांगली जिल्ह्यातील नागरिकांना विशेषतः वारणा आणि कृष्णा नदीकाठच्या नागरिकांना विनंती आहे की त्यांनी घाबरून जाऊ नये. जिल्ह्यातील नद्यांची पातळी थोडीशी वाढली आहे. प्रशासनाने पाण्याचा विसर्ग कर्नाटकाकडे वाढवला तर नद्यांच्या पाण्याची पातळी कमी होईल. नागरिकांनी प्रशासनाने दिलेल्या सूचनांचं पालन करा, असं ते म्हणाले.

पूरस्थिती असलेला भाग जर खाली केला जात असेल तर मागे राहण्याचे धाडस करू नका. आपल्या जनावरांना घेऊन सुरक्षित ठिकाणी पोहोचा. सर्व काही पावसावर अवलंबून आहे. सर्वांनी काळजी घ्या. कार्यकर्ते, प्रशासन आपल्या सोबत आहे, असं आवाहनही त्यांनी केलं आहे.

कोयणा कोयना धरण पाणलोट क्षेत्रात आणि घाटमाध्यावर कोसळणाऱ्या मुसळधार पावसाचा जोर पुन्हा वाढला आहे. त्यामुळे कोयना धरणात येणाऱ्या पाण्याची आवक वाढली आहे. कोयना धरणात ८२.०१ टीएमसी पाणीसाठा झाला होतो. सध्या कोयना धरणातून ३० हजार क्युसेक आणि पायथा विजगृहातून एक हजार ५० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. बहुतेक धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आल्यामुळे कृष्णा आणि वारणा नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे पुराचा धोका वाढला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: भोंदू राजेंद्र गडगेच्या आश्रमाची वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून झाडाझडती

Shocking : रुसून माहेरी गेलेल्या पत्नीला आणायला गेला, सासऱ्यांनी नकार दिला; रागात जावयाने सासरवाडी पेटवली

सिंधुदुर्गातील समुद्रात मोठी दुर्घटना; वादळाच्या तडाख्यात नौका बुडाली

Young adults lifestyle: शिक्षणासाठी घरापासून दूर असलेल्या तरूणांना या आजाराचा धोका; संशोधनातून धक्कादायक बाब समोर

EPFO Update: EPFO कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! ६० वर्षानंतर PFच्या नियमात मोठे बदल

SCROLL FOR NEXT