Sangli News Saam Tv
महाराष्ट्र

सांगली - कोल्हापूर जिल्ह्याला जोडणारा ऐतवडे खुर्द येथील वारणा नदीवरील पूल पाण्याखाली

सांगलीच्या चांदोली धरणातून पाण्याचा होणारा विसर्ग आणि पावसाची संततधार यामुळे वारणा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे.

साम टिव्ही ब्युरो

सांगली : सांगलीच्या (Sangli) चांदोली धरणातून पाण्याचा होणारा विसर्ग आणि पावसाची संततधार यामुळे वारणा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. वाळवा तालुक्यातील ऐतवडे खुर्द येथील वारणा नदीच्या पुलावर पाणी आले असून सांगली कोल्हापूर जिल्ह्याचा संपर्क तुटला आहे.

शालेय विद्यार्थी वारणा व कोल्हापूर जिल्ह्याकडे जाणारा कर्मचारी वर्ग चिकुर्डे मार्ग जात आहेत. सध्या वारणा नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ होत असून, पुराचे पाणी पात्रा बाहेर आल्याने नदी काठावरील लोकांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा दिला जात आहे. संततधार पावसामुळे ओढा, वगळी नाले तुडुंब भरून वाहत आहेत. तर शेती पिकात पाणी साचून राहिले आहे. ग्रामपंचायत, तलाठी, पोलीस पाटील ऐतवडे खुर्दने नदी काठावरील लोकांना सतर्कचा इशारा दिला असून प्रशासनाच्या मदतीची वाट न बघता स्वतःहून सुरक्षित ठिकाणी स्थलांतर होण्याचे सांगितले आहे.

चांदोली धरण भरल्याने धरणातून 5600 क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग होत असल्याने पुराच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. गावापासून पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या पर्वतवाडी येथील लोकांना स्थलांतर होण्याच्या सूचना प्रत्यक्ष भेटून ग्रामपंचायत प्रशासनाने दिल्या आहे. कुरळप पोलीस (Police) पूर परिस्थितीची पाहणी करून या ठिकाणी बंदोबस्त ठेवला आहे. संततधार पावसामुळे नदी काठावरील लोकांना महापुराची धास्ती लागली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IPL 2025 Mega Auction Live: अय्यरचा भाव वाढला! पंजाबने लावली IPL इतिहासातील सर्वात मोठी बोली

IPL 2025 Mega Auction: श्रेयस अय्यरने इतिहास रचला! लागली IPL स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात मोठी बोली

Sanjay Kelkar News : ठाण्याच्या विकासासाठी लवकरच पुढचं धोरण ठरवणार; संजय केळकरांनी मानले मतदारांचे आभार

Maharashtra News Live Updates: सत्ता आपली आली आहे, कामं करत राहा, अजित पवारांचा पराभूत झालेल्या उमेदवारांना दिलासा

IND vs AUS 1st Test Day 3: यशस्वी- विराटनंतर, बुमराह चमकला! टीम इंडिया विजयाच्या उंबरठ्यावर

SCROLL FOR NEXT