jayant patil 
महाराष्ट्र

दिग्गजांचा जयंतरावांकडून करेक्ट कार्यक्रम; महाविआ १७, भाजप ६

भाजप विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत सांगलीत हाेती.

विजय पाटील

सांगली : सांगली (sangli) जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (dcc bank) निवडणूकीत महाविकास आघाडीच्या सहकार पॅनेलने १७ जागांवर विजय मिळविला आहे. यामध्ये राष्ट्रवादी काॅंग्रेस नऊ, काॅंग्रेस पाच, शिवसेना तीन अशा १७ जागांचा समावेश आहे. या निवडणुकीत भाजपला ४ जागांवर समाधान मानावे लागले आहे. या बॅंकेच्या संचालक मंडळातील २१ जागांपैकी तीन जागा यापुर्वीच बिनविरोध झाल्या आहेत. काही ठिकाणी धक्कादायक निकाल लागले आहेत. (sangli district central co-operative bank election result 2021)

सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मतमोजणी आज (साेमवार) दुपारी संपली. या निवडणुकीत कोण बाजी मारणार याची उत्सुकता सर्वांना हाेती. भाजप विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत आहे. मंत्री जयंत पाटील आणि विश्वजित कदम यांची प्रतिष्ठा येथे पणाला लागली हाेती. यापुर्वी बँकेवर राष्ट्रवादी काँग्रेस प्रणित सत्ता होती. आता पुन्हा महाविकास आघाडीच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस, काॅंग्रेस आणि शिवसेना हे सत्तेत आले आहेत.

सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे विद्यमान संचालक मंडळ

महेंद्र लाड काँग्रेस/पलूस सोसायटी गट (बिनविरोध)

आमदार मानसिंगराव नाईक राष्ट्रवादी/शिराळा सोसायटी गट (बिनविरोध)

आमदार अनिलभाऊ बाबर शिवसेना/खानापूर सोसायटी गट (बिनविरोध)

विजयी झालेले संचालक

विशाल पाटील काँग्रेस/मिरज सोसायटी गट

आमदार मोहनराव कदम काँग्रेस/कडेगाव सोसायटी गट

जयश्री मदन पाटील काँग्रेस /महिला गट

अनिता सगरे राष्ट्रवादी/महिला गट

दिलीप पाटील राष्ट्रवादी/वाळवा सोसायटी गट

बी. एस. पाटील राष्ट्रवादी/तासगाव सोसायटी गट

प्रकाश जमदाडे भाजपा/जत सोसायटी गट

तानाजी पाटील शिवसेना/आटपाडी सोसायटी गट

अजितराव घोरपडे शिवसेना/कवठेमहांकाळ सोसायटी गट

वैभव शिंदे राष्ट्रवादी/पाणीसंस्था गट

मन्सूर खतीब राष्ट्रवादी/ओबीसी गट

बाळासाहेब होनमोरे राष्ट्रवादी /अनुसुचित जाती जमाती गट

राजेंद्र उर्फ चिमण डांगे राष्ट्रवादी/भटक्या जमाती

सुरेश पाटील राष्ट्रवादी/प्रक्रिया गट

पृथ्वीराज पाटील काँग्रेस/पतसंस्था

राहुल महाडिक भाजपा/पतसंस्था

संग्रामसिह देशमुख भाजपा/औद्योगिक प्रक्रिया गट

सत्यजित देशमुख भाजपा/औद्योगिक प्रक्रिया गट

edited by : siddharth latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : ई पीक पाहणीत 'हापूस'ला स्वतंत्र ओळख द्या रत्नागिरीतील शेतकऱ्यांची मागणी

Shiv Sena UBT : ठाकरे गटाच्या आक्रमक नेत्यावर कारवाई, उपनेता वर्षभरासाठी थेट येरवडा जेलमध्ये, राज्यात मोठी खळबळ

Heart Health : छातीत दुखण्याव्यतिरिक्त शरीरात 'ही' ६ लक्षणे दिसल्यास सावधान!

Monday Horoscope : सावध राहा! 6 राशींच्या आयुष्यात येणार मोठा बदल; पैसा, करिअर अन् नात्यांमध्ये काय घडणार?

Animal Facts : कोणता प्राणी उभा राहून झोपतो? ९०% लोकांना माहितीचं नाही

SCROLL FOR NEXT