Sangli DCC Bank saam tv
महाराष्ट्र

Sangli DCC Bank : सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक साखरेच्या किमतीच्या 90 टक्के कर्ज देणार : आमदार मानसिंगराव नाईक

याबाबत जिल्ह्यातील कारखानदारांची लवकरच बैठक घेऊन अंतिम धोरण ठरविण्यात येणार असल्याचे बँकेचे अध्यक्ष नाईक यांनी सांगितले.

विजय पाटील

Sangli News : यंदा साखरेचे उत्पादन कमी होणार याचा विचार करून साखर कारखान्यांना गतवर्षे प्रमाणे साखरेच्या किमतीच्या 90 टक्के कर्ज देण्याचा निर्णय सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेने (sangli dcc bank) घेतला आहे. याबाबत बॅंकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत निर्णय घेतल्याची माहिती अध्यक्ष आमदार मानसिंगराव नाईक (mla mansinghrao naik) यांनी दिली. (Maharashtra News)

आमदार नाईक यांच्या अध्यक्षतेखाली संचालक मंडळाची नुकतीच बैठक झाली. जिल्ह्यातील साखर कारखान्यांना जिल्हा मध्यवर्ती बँकेतर्फे कर्जपुरवठा करण्यात येतो. सन 2023 मधील गाळप हंगामासाठी मंजूर करावयाच्या खेळत्या भांडवली कर्जाच्या धोरणावर चर्चा झाली.

यंदा ऊस उत्पादन कमी होण्याचा अंदाज असून कारखाने ही कमी कालावधीसाठी सुरू राहतील त्यामुळे सध्या तरी गतवर्षीप्रमाणे साखरेच्या किमतीच्या 90 टक्के कर्ज पुरवठा करण्याचे ठरवले आहे. याबाबत जिल्ह्यातील कारखानदारांची लवकरच बैठक घेऊन अंतिम धोरण ठरविण्यात येणार असल्याचे बँकेचे अध्यक्ष नाईक यांनी सांगितले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

BP Medicines Precautions: ब्लड प्रेशरची रोज गोळ्या घेताय? मग, 'या' ७ गोष्टींची काळजी घ्या

Maharashtra News Live Update: चाकण MIDC च्या विकासासाठी '३-स्तरीय' (Short, Mid, Long term) कृती आराखडा

Paper Dosa Recipe : घरच्या घरी कुरकुरीत पेपर डोसा असा करा तयार; रेस्टॉरंटची चव विसराल!

मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय! नवजात बाळांना देणार सोन्याची अंगठी; १,२८,४९९ अंगठ्यांची ऑर्डर

Kaju Benefits: रोज ४ काजू खाल्ल्याने काय होते? जाणून घ्या शरीराला मिळणारे जबरदस्त ७ फायदे

SCROLL FOR NEXT