Sangli Crime News Saam TV
महाराष्ट्र

Sangli: दारुच्या वादातून तिघांना मारहाण करत घरासह दोन दुचाकी पेटवल्या; प्रकरणाला जातीय रंग?

Sangli Crime News : एकाच समाजातील तिघांना गंभीर मारहाण करुन घर आणि दोन दुचाकी गाड्या पेटवून दिल्याची घटना घडली आहे.

विजय पाटील, साम टीव्ही, सांगली

सांगली: सांगलीच्या (Sangli) जत तालुक्यातील शेड्याळ येथे पूर्ववैमनस्य व दारू देण्याच्या कारणांमुळे झालेल्या वादातून एकाच समाजातील तिघांना गंभीर मारहाण करुन घर आणि दोन दुचाकी गाड्या पेटवून (Crime) दिल्याची घटना घडली आहे. गुरुवारी रात्री ही घटना घडली आहे. मारहाणीत एकजण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत, तर दोघे किरकोळ जखमी झाले आहेत. या घटनेने गावात तणावाचे वातावरण पसरले होते, त्यामुळे मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. (Sangli Crime News)

हे देखील पाहा -

या घटनेत बादल रमेश चव्हाण गंभीर जखमी झाले असून उपचारासाठी तातडीने सांगलीला हलवण्यात आले. सागर चव्हाण आणि आकाश चव्हाण दोघेही किरकोळ जखमी झालेत. जत पोलिस ठाण्यात सागर चव्हाण याने फिर्याद दिली आहे. पोलिसांनी माजी सरपंच अशोक पाटील, माजी सैनिक चंदू गुगवाड, सुरेश देवर्षी, मास्तर तेली, सुरेश हावगोंडी (सर्व शेड्याळ) यांच्यासह अनोळखी पाच, अशा एकुण दहा जणांविरोधात जातीवाचक शिवीगाळ, जाळपोळ, गंभीर मारहाण, जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. माजी सैनिक चंदु गुगवाड आणि सुरेश देवर्षी यांना पोलिसांनी अटक केली आहे, तर अन्य संशयितांचा शोध सुरू आहे.

जत तालुक्यातील शेड्याळ येथे चव्हाण कुटुंब आई-वडील आणि तिघे भाऊ असे राहण्यास आहेत. गाव आणि परिसरात मिळेल ती मजुरी करुन कुटुंबाची गुजराण करीत आहेत. गुरूवारी रक्षाबंधन असल्याने रमेश चव्हाण आणि आई सखुबाई हे सोरडी येथे नातेवाईकांकडे गेले होते. घरी तीन भाऊ होते. गुरुवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास माजी सरपंच अशोक पाटील, माजी सैनिक चंदू गुगवाड, सुरेश देवर्षी, मास्तर तेली, सुरेश हावगोंडी हे चव्हाण यांच्या घरी गेले. या लोकांशी पूर्वीही किरकोळ कारणांमुळे वाद झाला होता.

घरी आल्यानंतर सागरने काय काम आहे? अशी विचारणा केली. त्यावर वडिलांनी त्यांच्यासाठी आणलेली दारू कुठे आहे? असे विचारून दारू दे, अशी मागणी केली. पुन्हा वाद नको म्हणून एक दारुची बाटली त्याने दिली, तेव्हा दुसरी बाटली त्यांनी मागितली. सागरने वडील आल्यानंतर त्यांच्याकडून घेऊन जा, असे सांगितले. याच कारणावरून या पाच जणांनी सागर चव्हाण, भाऊ आकाश चव्हाण आणि बादल चव्हाण यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली आणि मारहाण केली, पूर्वीच्या भांडणाचा राग त्यांच्या मनात होता असं सांगितलं जातंय.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

El Niño : मान्सून का रेंगाळला? 'एल निनो'चा महाराष्ट्रावर काय होणार परिणाम? पुण्यात पाऊस कधी कोसळणार? पाहा IMD चा अंदाज

Maharashtra News Live Update : मोफत सोयाबीन बियाणे वाटपादरम्यान आष्टी तालुका कृषी कार्यालयात गोंधळ

Shocking : धक्कादायक! बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडला गर्भनिरोधक गोळ्या दिल्या; अतिरक्तस्राव झाला अन् भयंकर घडलं

Thyroid Health Tips: थायरॉइड कंट्रोलमध्ये ठेवायचा आहे? मग डॉक्टरांनी सांगितलेले हे ७ घरगुती उपाय नक्की करा

India vs Afghanistan ODI: रोहितचा रेकॉर्ड, विराटच्या जागी कोणाला संधी? वाचा अफगाणिस्ताविरूद्ध कशी असणार टीम इंडियाची प्लेईंग 11

SCROLL FOR NEXT