Sangli Crime Saam tv
महाराष्ट्र

Sangli Crime : आरग येथे पद्मावती मातेच्या मंदिरातून १८ तोळे सोने चोरी; चोरटे सीसीटीव्हीमध्ये कैद

Sangli News : मिरज तालुक्यातील आरग येथील लोकवस्तीत पद्मावती मातेचे मंदिर आहे. याठिकाणी भाविकांची दर्शनासाठी गर्दी असते मध्यरात्री अज्ञात चोरट्यानी मंदिराच्या बाजूस असणाऱ्या जिन्याने मंदिरात प्रवेश केला

विजय पाटील

सांगली : सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील आरग येथील प्रसिद्ध पद्मावती मातेच्या मंदिरात चोरीची घटना उघडकीस आली आहे. गाभाऱ्यातील देवीच्या अंगावरील तब्बल १८ तोळे सोने चोरट्यानी लंपास केले आहे. मंदिरात चोरी करणारे चोरटे सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाले आहेत. दरम्यान सकाळी हा प्रकार लक्षात आला असून पोलिसांकडून या प्रकरणी तपास सुरु करण्यात आला आहे. 

सांगली जिल्ह्याच्या मिरज तालुक्यातील आरग येथील लोकवस्तीत पद्मावती मातेचे मंदिर आहे. याठिकाणी नेहमीच भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी असते. दरम्यान मध्यरात्री अज्ञात चोरट्यानी मंदिराच्या बाजूस असणाऱ्या जिन्याने मंदिरात प्रवेश केला. मंदिराचे पुजारी मंदिरात गेले असता मंदिराचे कडी तुटल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे त्यांना मंदिरात चोरी झाल्याचा संशय आला. यानंतर गाभाऱ्यात प्रवेश केल्यानंतर देवीच्या अंगावरील दागिने आढळून आले नाही. 

पोलिसांकडून तपास सुरु 

मंदिराच्या पुजारीने तात्काळ मिरज पोलीस स्टेशनशी संपर्क साधुन सदरील घटनेची माहीती दिली. हा प्रकार उघड होतास भाविकांना मोठा धक्का बसला. पोलिसांना घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस प्रशासन दाखल झाले. पोलीसांनी मंदिर परिसरात पाहणी केली. सकाळी श्वान पथकासह, एलसीबी, फॉरेन्सिक लॅबचे पोलीस दाखल झाले असून तपास सुरू करण्यात आला आहे. 

चोरटे सीसीटीव्ही कॅमेरात कैद 

दरम्यान मंदिराच्या सीसीटीव्ही कॅमेरात चोरटे कैद झाले आहेत. यात चोरटयांनी गाभाऱ्यासमोरील लाकडी दाराची कडी कटवनींच्या साह्याने उचकटत गाभाऱ्यात प्रवेश केल्याचे निदर्शनास आले आहे. यानंतर चोरटयांनी देवीच्या अंगावर घालण्यात आलेले सुमारे १८ तोळे सोने चोरट्यानी लंपास केले असून या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांकडून शोध सुरु आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rahul Gandhi: राहुल गांधींच्या आंदोलनाला यश, पेलेट गनप्रकरणी अखेर गुन्हा, FIR मध्ये कुणाची नावं?

Vangyachi Chatni Recipe : गरमागरम भाकरी अन् वांग्याची झणझणीत चटणी, चव इतकी भन्नाट की विचारू नका!

Maharashtra News Live Update: आंबेगावच्या पोषण आहारावर ग्रामस्थांचा आक्षेप; काळवाडीत धान्याचे सॅम्पल घेऊन तपासणी सुरू

Perfume Tips: महागडा परफ्यूम लावूनही काही वेळात सुगंध गायब होतोय? 'या' चुका टाळा, फ्रॅग्रन्स राहील दिवसभर!

Saturday Horoscope : मेहनीचं फळ मिळेल, ५ राशींचे भाग्य चमकणार; वाचा शनिवारचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT