Sangli Crime Saam tv
महाराष्ट्र

Sangli Crime : चोर समजून पोतराजासह दोघांना मारहाण; विटा-कराड रस्त्यावरील प्रकार, सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Sangli News : लक्ष्मी देवीचा कार्यक्रम संपवुन १७ वर्षीय पोतराज लक्ष्मण मारुती दुबळे व त्याचा मित्र संदीप विठ्ठल पवार हे परतले होते. मात्र हे दुचाकीने येत असताना यांच्यावर अचानक हल्ला करण्यात आला

विजय पाटील

सांगली : देवीच्या दर्शनाला गेल्यानंतर तेथून दोघेजण दुचाकीने परतले होते. मात्र चोर समजून पोतराजासह दोघांना मारहाण झाल्याची घटना विटा- कराड रस्तावर घडली आहे. याप्रकरणी अज्ञात सहा हल्लेखोरांवर चिंचणी- वांगी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लक्ष्मी देवीचा कार्यक्रम संपवुन १७ वर्षीय पोतराज लक्ष्मण मारुती दुबळे व त्याचा मित्र संदीप विठ्ठल पवार हे परतले होते. मात्र हे दुचाकीने येत असताना यांच्यावर (Crime News) अचानक हल्ला करण्यात आला. चोर समजून त्यांच्या दुचाकीचा पाठलाग करून अज्ञात पाच ते सहा जणांनी काठीने जबर मारहाण करून (Sangli) जखमी केले. तर हल्लेखोरांनी संदीप याच्या गळ्यातील १ हजार २०० रुपये किमतीची चांदीची साखळी व पोतराज लक्ष्मण याच्या बॅगेतील रोख २ हजार ५०० रुपये काढून तेथून पळ काढला. 

दरम्यान पोतराज लक्ष्मण दुबळे याने याप्रकरणी दिलेल्या तक्रारीनुसार चिंचणी- वांगी पोलिस ठाण्यात अज्ञात पाच ते सहा जणांविरुद्ध गुन्हा गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Animal Facts : कोणता प्राणी उभा राहून झोपतो? ९०% लोकांना माहितीचं नाही

कुछ बडा होनेवाला है! 48 आमदारांना पीएम मोदींनी दिलं नवं मिशन; केजरीवालांसह राहुल गांधींना बसणार मोठा धक्का

देशात 'नमो'ची लाट परत आणण्यासाठी भाजपनं आखली नवी रणनीती; राज्यात ‘नमो सेवा’चा शुभारंभ

3 Gram Mangalsutra For Women: महिलांसाठी 3 ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र, रोज घालण्यासाठी एकदम बेस्ट

सुप्रीम कोर्टात पोहोचला मुख्य निवडणूक आयुक्तांचा वाद; ज्ञानेश कुमारांच्या विरोधातील याचिकेवर होणार सुनावणी

SCROLL FOR NEXT