Sangali Crime News Saam TV
महाराष्ट्र

Sangli Crime News: पूर्ववैमनस्यातून दाबेली विक्रेत्याचा काढला काटा; भररस्त्यात चाकूने केले सपासप वार

Dabeli selar: या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून पोलीस या प्रकरणी अधिक तपास करतायत.

विजय पाटील

Sangli News: सांगली येथे घातपाताची एक मोठी घटना घडली आहे. पूर्ववैमनस्यातून एका व्यक्तीची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून पोलीस या प्रकरणी अधिक तपास करतायत. (Latest Sangli Crime News)

कुपवाड शहरातील यशवंतनगर परिसरामध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. एका हातगाडी विक्रेत्याचा निर्घृण खून करण्यात आला असून पूर्ववैमनस्यातून हा खून झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. शुभम माने असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव असून रात्री दहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.

शुभमच्या छातीवर व डोक्यावर धारदार हत्याराने एकूण सात वार करण्यात आलेत. हल्ला केल्यानंतर हल्लेखोर घटनास्थळावरून फरार झालेत. मिरज ते माधवनगर रस्त्यावरील यशवंतनगर येथे दाबेली विक्रेता शुभम माने याचा धारदार शस्त्राने वार करुन निर्घृण खून केल्याचा प्रकार घडलाय. याबाबत माहिती मिळताच कुपवाड व संजयनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

यशवंतनगर चौक ते आंबा चौक रस्त्यावर शुभम माने याचा दाबेलीचा गाडा आहे. रात्री साडे नऊच्या सुमारास गाड्यावर आलेल्या तरुणांनी शुभमशी वाद घातला. या वादातून हल्लेखोरांनी त्याच्या चेहऱ्यावर व इतरत्र वार केले. या हल्ल्यात शुभम गंभीर जखमी झाल्यानंतर हल्लेखोर अंधारात पसार झाले.

गंभीर जखमी झालेल्या शुभमला उपचारासाठी सांगलितील (Sangali) सिव्हील हॉस्पिटलमध्ये (Hospital) दाखल केले. परंतू उपचार सुरु असताना देखील नराधमांनी शुभमवर सात वार केले आहेत. यात त्याचा मृत्यू झाला. हल्ल्यानंतर यशवंतनगर चौकात मोठ्या संख्येने गर्दी जमली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Actor Death: ज्येष्ठ अभिनेते काळाच्या पडद्याआड; मुलाने दिली निधनाची बातमी, सिनेविश्वाला मोठा धक्का

Gold Price Today: आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोनं महागलं की स्वस्त झालं? पाहा तुमच्या शहरातील २४, २२ आणि १८ कॅरेट आजचे दर

Maharashtra News Live Update: रत्नागिरी- रायगडचा पालकमंत्री कोणाला करायचं हे तिन्ही नेते एकत्र बसून लवकर निर्णय घेतील- चंद्रशेखर बावनकुळे

Fashion Tips : या कारणामुळेच काही कपडे घातल्यावर चेहरा उजळतो आणि काहींमध्ये डल दिसतो!

LPG Cylinder Price: ग्राहकांना आता मिळणार १० किलोचा सिलिंडर; डिलीव्हरीही होईल झटपट, जाणून घ्या किती असेल किंमत?

SCROLL FOR NEXT