Sangli Palus Educational Director Killed Saam Tv
महाराष्ट्र

Sangli Crime: शिक्षण संस्थेच्या संचालकाची हत्या, अल्पवयीन मुलाने धारदार शस्त्राने वार करत संपवलं

Sangli Palus Educational Director Killed: सांगलीमध्ये शिक्षण संस्थेच्या संचालकाची हत्या करण्यात आली होती. १८ मार्च रोजी ही घटना घडली होती. या प्रकरणी एका अल्पवयीन मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतलं.

Priya More

Summary -

  • सांगलीतील पलूस येथे शिक्षण संस्थेच्या संचालकाची हत्या

  • संजय परांजपे यांचा पार्किंगमध्ये मृतदेह सापडला होता

  • हत्या प्रकरणाचा छडा लावण्यात पोलिसांना यश

  • किरकोळ वादातून अल्पवयीन मुलाने धारदार शस्त्राने वार करत केली हत्या

विजय पाटील, सांगली

सांगलीमध्ये शिक्षण संस्थेच्या संचालकाची हत्या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. या प्रकरणी सांगली पोलिसांनी एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतलं आहे. धारदार शस्त्राने वार करत अल्पवयीन मुलाने पसूस येथील शिक्षण संस्थेच्या संचालकाची हत्या केली होती. संजय प्रभाकर परांजपे (६० वर्षे) असं या संचालकाचे नाव होते. इमारतीच्या पार्किंगमध्येच त्यांचा मृतदेह सापडला होता. या घटनेमुळे सांगलीत खळबळ उडाली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, पलूस येथील एका नामांकित शिक्षण संस्थेचे संचालक संजय परांजपे यांच्या हत्येचा अखेर उलगडा झाला आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने ५ दिवसांनंतर गुन्ह्याचा छडा लावला. या प्रकरणी एका अल्पवयीन मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. किरकोळ वादातून त्याने संजय परांजपे यांची हत्या केल्याचे तपासातून उघडकीस आले आहे. १८ मार्च रोजी संजय परांजपे यांची पलूसमध्ये धारदार शस्त्रांनी वार करत हत्या करण्यात आली होती.

संजय परांजपे राहत असलेल्या इमारतीच्या पार्किंगमध्ये त्यांचा एका अल्पवयीन मुलाशी किरकोळ वाद झाला होता. या वादातून मुलाने परांजपे यांना ढकलून दिले. त्यामुळे ते खाली पडले आणि त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यानंतर ही बाब परांजपे घरी सांगतील या भीतीपोटी या मुलाने टोकदार शस्त्रांनी त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या परांजपे यांचा जास्त रक्तस्राव होऊन मृत्यू झाला होता. या हत्याकांडानंतर सांगली पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करत तपास सुरू केला होता. अखेर पलूस पोलिसांनी अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतलं.

पलूस येथील मारुती मंदिराजवळ संजय परांजपे यांचा जुना वाडा आहे. वाड्यालगतच त्यांचे नवीन गजानन सदन नावाचे अपार्टमेंट आहे. १८ मार्च रोजी सायंकाळी ५.३० वाजताच्या दरम्यान परांजपे मंदिरात दर्शनासाठी जातो असे सांगून घरातून बाहेर पडले. मात्र बराच वेळ झाला ते घरी आले नाहीत. त्यामुळे कुटुंबीयांनी संपर्क करण्याचा प्रयत्न केला. तरीही त्यांचं काहीच उत्तर मिळालं नाही. त्यामुळे परांजपे यांचा मुलगा त्यांचा शोध घेण्यासाठी घराबाहेर पडला. यावेळी त्याला इमारतीच्या पार्किंगमध्ये त्यांचा मृतदेह आढळून आला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai T20 League: टी-२० लीगमध्ये मराठा संघाची 'रॉयल' कामगिरी; सलग दुसऱ्यांदा जेपेतपदावर कब्जा

अनुसूचित जातीत उपवर्गीकरण करायला हरकत नाही; रामदास आठवलेंनी सांगितलं कारण, VIDEO

IND vs AFG: शुबमन गिलसमोर अफगाण गोलंदाजी फेल; टीम इंडियाचा पहिल्या वनडेत शानदार विजय

Yavatmal Crime: खासगी रुग्णालयात धारदार शस्त्राने हल्ला करत नर्सची हत्या; यवतमाळ हादरलं

वीज मीटर ४८ तासांत बदलणार; 'महावितरण'कडून ग्राहकांना अल्टिमेटम? काय आहे मेसेजमागचं सत्य?

SCROLL FOR NEXT