Sangli Crime News Saam tv
महाराष्ट्र

Sangli Crime: एमआयडीसीत गोदाम फोडून साहित्याची चोरी, विटा पोलिसांकडून चौघांना अटक; ७ लाखांचा मुद्देमाल जप्त

Crime News In Marathi: टोळीकडून चोरीचा ६.५५ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून आणखी चार गुन्हे उघडकीस आले आहेत.

विजय पाटील

Sangli Crime:

सांगलीच्या खानापूर तालुक्यात एमआयडीसीत गोदाम फोडून साहित्य चोरणाऱ्या चौघांच्या टोळीला अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून चोरीचे साहित्य, एक मारूती कार, स्क्रॅप असा सहा लाख पंचावन्न हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, सांगलीच्या (Sangli) खानापूर तालुक्यातील कार्वे येथील एमआयडीसीत गोदाम फोडून साहित्य चोरणाऱ्या चौघांच्या टोळीला अटक करण्यात आली. आहे. कार्वे येथील एमआयडीसीतील गोदामातून दीड लाखांच्या बॅगा चोरल्याची रोहित जाधव यांनी फिर्याद दिली होती.

यानंतर संशयितावार पथकाने सापळा रचून त्यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे कसून चौकशी केल्यानंतर त्यांनी चोरीची कबुली दिली. त्यांच्याकडून चोरीचे साहित्य, एक मारूती कार, स्क्रॅप असा सहा लाख पंचावन्न हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

या टोळीकडून चोरीचा ६.५५ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून आणखी चार गुन्हे उघडकीस आणल्याची माहिती विट्याचे पोलिस निरीक्षक संतोष डोके यांनी दिली आहे. आकाश विजेश गोसावी (वय २५), रविंद्र तुकाराम गोसावी (वय ३३), विनोद रामप्पा गोसावी (वय ३०), अनिल रामप्पा गोसावी (वय २५, सर्व रा. म्हैसाळ, ता. मिरज) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Health Care: शरीराला आतून हळूहळू नुकसान पोहोचवतात 'या' ७ सवयी; आजच बदला तुमची लाइफस्टाइल

Maharashtra : शरद पवारांचं आमंत्रण अन् नरेंद्र मोदी पुन्हा बारामती दौऱ्यावर, नेमकं कारण काय?

Shubman Gill: ‘ते काम अजून अपूर्ण आहे...’ 2027 वर्ल्ड कपसाठी शुभमन गिलचं मोठं लक्ष्य; रोहित-विराटबाबतही सांगितली मनातली गोष्ट

Maharashtra News Live Update: पिक पंचनाम्यात बाधित क्षेत्र कमी दाखवू नका; 100 टक्के नुकसान दाखवा, आमदार कैलास पाटलांची मागणी

अभिजित दिपकेंवर गुन्हा दाखल, मुंबईतील विनापरवानगी आंदोलन भोवले; पाहा अपडेट

SCROLL FOR NEXT