सांगली : सांगली (sangli) कृष्णा नदीवरील (krishna river) ८९ वर्षाचा ऐतिहासिक बंधारा पाटबंधारे विभागाच्या वतीने पाडण्यात येत असल्याचा दावा करत पैलवान पृथ्वीराज पवार यांनी सर्व सांगलीकरांनी एकत्र या आणि चला बंधारा वाचवू या असे म्हणत सांगलीकर नागरिकांनी आज (रविवार) सांगलीच्या कृष्णा नदीवर असलेल्या बंधाऱ्यावर मानवी साखळी करून शासनाच्या निर्णयाला विरोध केला आहे. या आंदोलनामध्ये (aandolan) सांगलीकर मोठ्या संख्येने सहभागी झाले हाेते. (sangli latest marathi news)
सांगलीच्या कृष्णा नदीवर सन १९३३ कालावधीत बांधण्यात आलेला बंधा-यास आज ८९ वर्षे पूर्ण झाले आहेत. सांगली आणि परिसरातील सुमारे नऊ लाख नागिरक आणि असंख्य जनावरे आणि वृक्षवल्लींची हा बंधारा तहान भागवतो. या बंधाऱ्यात आडवल्या जाणाऱ्या पाणी साठ्यातून सांगली, कुपवाड, पद्माळे, कर्नाळ, माधवनगर, कवलापूर, बुधगांव, सांगलीवाडी यासह काही गावात पिण्यासाठी व सिंचनासाठी दररोज लाखो लिटर पाणी उपसा केले जाते.
सांगलीचा बंधारा पाडून जर म्हैसाळमध्ये पाणी आडवले तर हरिपूरच्या संगमापासून मौजे डिग्रजच्या बंधाऱ्यापर्यंत पाण्याचा एक मोठा डोह तयार होणार आहे. या डोहात शहारातील चार नाल्यामधून रोज अंदाजे १५ ते २० लाख लिटरपेक्षाही जास्त सांडपाणी गटार मिसळणार आहे. औद्योगिक वसाहतीतून येणारे रासायनिक पाणी व शहराच्या सांडपाण्यामुळे शहराची घाण पुन्हा नऊ लाख लोकांच्या नळामधून घरपोच होऊ शकते.
हरिपूर संगमापासून डिग्रजच्या बंधा-यापर्यंत मगरीचा मुक्त वावर असणारी वसाहत होऊन नदीकाठचे शेतकरी , जनावरे , रहिवाशी व जलतरणास मोठा धोका निर्माण होऊ शकतो. तसेच सांगली, कोल्हापूर (kolhapur) नदीकाठचे सुमारे चार हजार एकर जमीन कायमची बाधीत होऊन शेतकऱ्यांचे व रहिवाश्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकतो. त्यामुळे याचे गंभीर परिणाम होऊ शकतात.
आज जागतीक पर्यावरण दिनादिवशी सांगली अमरधाम शेजारी बंधाऱ्याजवळ जागृत सांगलीकर नागरीक यांनी एकत्र येवून प्रतिकात्मक मानवी साखळी बनवून बंधारा वाचविण्याचा संदेश दिला आहे.
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.