Mhaisal Canel OverFlow: Saamtv
महाराष्ट्र

Sangli News: म्हैसाळचा कालवा ओव्हरफ्लो, रस्त्यावर आणि शेतात पाणीच पाणी; पिकांचे मोठे नुकसान

Mhaisal Canel OverFlow: कालवा ओव्हर फ्लो झाल्याने रस्त्यावर तसेच जवळच्या शेतांमध्ये पाणीच पाणी झाल्याचे पाहायला मिळाले. यामुळे बेडग रस्त्यावरील वाहतून ठप्प झाली असून शेतजमिनीसह पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

विजय पाटील

Sangli News:

सांगली जिल्ह्यातील म्हैसाळचा कालवा पुन्हा एकदा ओव्हरफ्लो झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. कालवा ओव्हर फ्लो झाल्याने रस्त्यावर तसेच जवळच्या शेतांमध्ये पाणीच पाणी झाल्याचे पाहायला मिळाले. यामुळे बेडग रस्त्यावरील वाहतून ठप्प झाली असून शेतजमिनीसह पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, सांगलीच्या मिरज तालुक्यातील बेडग येथील म्हैसाळ योजनेच्या मुख्य कालवा पंप हाऊस टप्पा क्र. तीन मधील विद्युत पुरवठा खंडित झाल्याने कालवा ओव्हरफ्लो झाला. यामुळे आरग बेडग रस्त्यावरून कालव्याचे पाणी वाहत असल्याने रस्त्यावरील वाहतूक बंद झाली होती.

कालव्याचे पाणी परिसरातील शेतात घुसल्याने शेतजमिनीसह पिकांचे मोठे नुकसान झाले. एकीकडे मिरज पूर्व भागात शेतकऱ्यांना २४ तासाला २५ हजार रुपये भरून कालव्याचे पाणी विकत घ्यावे लागत आहे. पैसे भरूनही समाधानकारक पाणी मिळत नसल्याची तक्रार शेतकऱ्यांची आहे.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मागील वर्षी पाऊस कमी झाल्याने शेतकरी चिंतेत आहे. दुसरीकडे मात्र ओव्हरफ्लोमुळे लाखो लिटर पाण्याची नासाडी होत आहे. वाहून जाणाऱ्या पाण्यामुळे शेत जमिनीमधील माती खरडून गेली आहे. ऐन दुष्काळात म्हैसाळचे पाणी विकत घ्यावे लागत आहे. अधिकाऱ्यांच्या भोंगळ कारभारामुळे लाखो लिटर पाण्याची नासाडी होत असल्याची तक्रार शेतकऱ्यांकडून होत आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: तुळजापुरात शेतकऱ्याचा आत्मदहनाचा प्रयत्न; पोलिसांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला

Olya Khobryachi Karanji Recipe : ओल्या खोबऱ्याची करंजी बनेल एकदम खुसखुशीत, पीठ मळताना फॉलो करा 'या' ३ टिप्स

Maharashtra Drought: मोठी बातमी! राज्यात दुष्काळ जाहीर होणार, सरकारकडून हालचालींना वेग

Pakistan Afghanistan Conflict: पाकिस्तानकडून अफगाणिस्तानवर पुन्हा हवाई हल्ले; कुनार-पक्तिकामध्ये अनेक जण जखमी

दररोज खाव्यात अशा 7 हिरव्या भाज्या; शरीराला मिळतील ‘हे’ फायदे

SCROLL FOR NEXT