Maharashtra Air Pollution yandex
महाराष्ट्र

Maharashtra Air Pollution: सांगलीकर लय भारी, शहराची हवा राज्यात सर्वात शुद्ध; मुंबई-पुण्याला टाकले मागे

Sangli Air Pollution: जगभरात हवेच्या प्रदूषणात सातत्याने वाढ होत असल्याची तक्रार आपण नेहमीच ऐकतो. महाराष्ट्रातील सर्व शहरांत सांगलीची हवा सर्वाधिक चांगली आहे.

Dhanshri Shintre

हिवाळ्यात दिल्लीप्रमाणेच महाराष्ट्रातल्याही अनेक शहरात हवा खराब होताना दिसत आहे. विशेषतः मुंबई, नवी मुंबई, पुणे आणि आसपासच्या शहरांमध्ये जेथे सातत्याने बांधकामासंबंधित काम होतात, तेतील हवेचा दर्जा हा घसरत चालला आहे. त्यामुळे आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होत आहे. अशातच आता सांगली सर्वांत आरोग्यदायी शहर ठरले आहे.

महाराष्ट्रातील हवा प्रदुषणात घट होते आहे. वाढत्या औद्योगिकरणामुळे, वाहतुकीमुळे, शहरांच्या प्रदूषण पातळीने कमालीची मर्यादा ओलांडली होती. दिल्ली आणि महाराष्ट्रातील मुंबईतील चेंबूर सारख्या ठिकाणी तर गॅस चेंबरसारखी अवस्था झाली होती. सकाळच्या वेळी हे प्रदूषण अगदी धुक्यासारखे पसरलेले डस्ट अशी परिस्थिती हाती. पण आता महाराष्ट्रातील प्रदूषण नियंत्रणात येऊ लागले असल्याचे चित्र आहे.

सांगली सर्वात आरोग्यदायी शहर सांगली जिल्ह्यातील प्रदूषण राज्याच्या तुलनेत अगदी कमी असून राज्यातील सर्वात आरोग्यदायी हवा सांगलीची असल्याचा उल्लेख केंद्रीय प्रदूषण मंडळाने केला आहे. ही सांगलीकरांच्या दृष्टीने अगदीच अभिमानास्पद बाब आहे. हवेचे प्रदूषण मोजण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या मापदंडानुसार ० ते ५० या स्तरातील हवा सर्वात चांगली समजली जाते. सांगली, कोल्हापूरातील हवेची गुणवत्ता चांगली असल्याचे प्रदूषण नियंत्रण मंडळाचे निरीक्षण आहे. या जिल्ह्यांचा समावेश आरोग्यदायी शहरांमध्ये होतो.

51 ते 100 या इंडेक्स मधील हवा समाधानकारक समजली जाते. महाराष्ट्रातील 11 शहरे या इंडेक्समध्ये बसतात. अशी चांगल्या हवेची शहरे म्हणजे राज्यातील जवळपास 11 शहरांमधील हवा समाधानकारक आहे. तेथील हवेची गुणवत्ता 51 ते 100 इंडेक्सच्या दरम्यान आहे. त्यामध्ये पुणे, मुंबई, नागपूर, नाशिक, पिंपरी, अकोला, औरंगाबाद, अमरावती, जालना, सोलापूर या जिल्ह्यांचा समावेश आहे.

केंद्रीय प्रदूषण मंडळाच्या अहवालानुसार चांगली हवा ही ० ते ५० च्या दरम्यान नोंदली जाते. त्याला हवेची समाधानकारक गुणवत्ता म्हटले जाते. तिथे मानवी आरोग्याला अपायकारक असे प्रदूषण नसते. तेथील नागरिकांना आरोग्याचा धोका नसून, शुद्ध हवेत श्वास घेता येतो. अशा ठिकाणच्या नागरिकांना दमा, ब्रॉंकेटिक्स सारखे श्वसनाचे रोग होण्याची शक्यता फारच कमी असते. त्यानंतर ५० ते १०० दरम्यान हवेची पातळी नोंदली गेली. तर ती समाधानकारक समजली जाते. त्यासाठी ३ ते १६ नोव्हेंबर रोजी या कालावधीत हवेचा अभ्यास करण्यात आला. ३१ शहरांच्या तुलनेत सांगलीची हवा शुद्ध आणि आरोग्यदायी असल्याचे आढळले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Neeru Dhanda Asian Games 2026: नीरू ढांडाचा ट्रॅप शूटिंगमध्ये 'सुवर्ण'वेध, भारताला पाचवं गोल्ड मेडल

Maharashtra News Live Update: देशातून फरार असलेला निलेश घायवळ खंडणी प्रकरणात निर्दोष मुक्त

Maharashtra Drought: शेतकऱ्यांना दिलासा! दुष्काळात वगळलेल्या तालुक्यांचा यादीत समावेश, फडणवीस सरकारचा मोठा निर्णय

Tea Water for Hair: केसगळती कमी करुन केस होतील शायनी आणि घनदाट; केसांना लावा चहा पत्तीचं पाणी

World Heart Day: सतत गुडघेदुखीचा त्रास होतोय? हृदयासाठीही ठरू शकतो इशारा, जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला

SCROLL FOR NEXT