Sangli News Saam tv
महाराष्ट्र

Sangli News: अपघातात ६ बळी; ट्रॅक्टर चालकासह मालकावर गुन्हा दाखल

अपघातात ६ बळी; ट्रॅक्टर चालकासह मालकावर गुन्हा दाखल

विजय पाटील

सांगली : मिरजेत रत्नागिरी– नागपूर राष्‍ट्रीय महामार्गावर वड्डीजवळ विटांनी भरलेला ट्रॅक्टर आणि बोलेरो या वाहनाचा भीषण (Accident) अपघात झाला होता. या अपघातात एक कुटुंब उध्वस्त होऊन सहा जणांचा बळी गेला आहे. या अपघात प्रकरणी (Sangli News) ट्रॅक्‍टर चालकासह मालकावर गुन्‍हा दाखल केला आहे. (Tajya Batmya)

रत्‍नागिरी– नागपूर राष्ट्रीय महामार्गावर विरुद्ध दिशेने जाणाऱ्या विटांनी भरलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीचा आणि बोलेरो वाहनाचा भीषण अपघात झाला होता. यात सहा जणांचा बळी गेला. याप्रकरणी ट्रॅक्टर चालक कैलास कोळी याच्यावर मिरज शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. तर वड्डी गावचे माजी उपसरपंच राजू वजीर यांच्या मालकीचा वीट वाहतूक करणारा ट्रॅक्टर आहे.

चालकाकडे परवाना नाही

ट्रॅक्टरवर चालक असणाऱ्या कैलास कोळी यांच्याकडे वाहन चालक परवाना नसल्याचे पोलीस तपासात पुढे आले आहे. वाहन चालक परवाना नसतानाही वाहन चालविण्यास दिल्याबद्दल आयपीसी 109 नुसार राजू वजीर यांनाही या गुन्हात आरोपी करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Glowing Skin Tips: उन्हाळ्यात ग्लोईंग स्किनसाठी आहारात करा या 5 पदार्थांचा समावेश

Railway: मुंबईचा'करोडपती' टीटीआय, एका वर्षात वसूल केला १ कोटींचा दंड; नक्की काय आहे प्रकरण?

Maharashtra Politics: भाजप- शिंदेसेनेत अजूनही धुसफूस? एकनाथ शिंदे PM मोदींच्या भेटीला

Pune Tourism : आताच ठरवा! वीकेंडला करा पुण्याची सफर; 'येथे' बोटिंग, कॅम्पिंग अन् ट्रेकिंगचा घ्या आनंद

Rashmika - Vijay Haldi : रंग, प्रेम अन् आनंदाने भरलेला रश्मिका-विजयचा हळदी समारंभ, रोमँटिक PHOTOS आले समोर

SCROLL FOR NEXT