Sangli, Crime News, ACB, Bribe, Palus, Palus Police Station Saam Tv
महाराष्ट्र

Mahavitran News : 'महावितरण' चे दाेन अधिकारी लाच घेताना सापडले

पलूस पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

विजय पाटील

Mahavitran News : सांगली (Sangli) जिल्ह्यातील पलूस येथील वीज महावितरण कंपनीच्या कार्यालयात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई केली आहे. तक्रारदार यांच्या कंपनीने सादर केलेल्या सोलर इन्स्टॉलेशनची फाईल मंजूर करण्याकरिता उपकार्यकारी अभियंता अतुल श्रीरंग पेठकर (atul petkar) यांना 45 हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले. याप्रकरणी सहाय्यक अभियंता सागर विलास चव्हाण (sagar chavan) यालाही ताब्यात घेण्यात आले आहे. दोघांवर पलूस पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Sangli Latest Marathi News)

तक्रारदार यांनी पलूस येथील वीज महावितरण (mahavitran) कंपनीच्या कार्यालयात सोलर इन्स्टॉलेशनची फाईल सादर केली होती. ती फाईल मंजूर करण्यासाठी उपकार्यकारी अभियंता अतुल पेठकर व सहाय्यक अभियंता सागर चव्हाण यांनी संबंधिताला 45 हजार रुपयांची लाच मागितली होती. त्याबाबत संबंधिताने सांगलीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (ACB) तक्रार केली होती. (Breaking Marathi News)

या तक्रारीची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शहनिशा केली. त्यानंतर पेठकर व चव्हाण यांच्यावर एसीबीनं (acb) सापळा रचला. यावेळी पेठकर व चव्हाण यांनी तक्रारदाराला 45 हजार रुपयांचे लाच मागितल्याचे निष्पन्न झाले.

त्यानंतर संबंधिताला पैसे घेऊन पेठकर व चव्हाण यांच्याकडे पाठवण्यात आले. पेठकर यांनी तक्रारदाराला लाचेची (bribe) मागणी करून 45 हजार रुपये स्वीकारल्याचे समोर आले. याप्रकरणी सागर चव्हाण यालाही ताब्यात घेण्यात आले आहे. (Maharashtra News)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: कर्जतच्या टोरंट प्रकल्पाविरोधात शेकाप आक्रमक; वृक्षतोड थांबवण्याची मागणी

WhatsApp Tips : स्मार्टफोन चोरीला गेलाय? प्रायव्हेट चॅट्स लीक होण्यापूर्वी लगेच करा 'हे' काम, अन्यथा होईल मोठा अनर्थ

Shivali Parab: 'पुराना ज़माना नया हो गया है...'; कल्याणच्या चुलबुलीचा बोल्ड साडी लूक, शिवालीचे मोहक फोटो व्हायरल!

Back Dark Spots : साडीमध्ये पाठ काळी दिसतेय? पाठीवरचे डाग कमी करण्यासाठी 4 झटपट उपाय

Home Fragrance: घरात 5-स्टार हॉटेलसारखं वातावरण हवंय, हे सीक्रेट्स बदलून टाकेल घराचा संपूर्ण माहोल

SCROLL FOR NEXT