Ahmednagar News Saam TV
महाराष्ट्र

Ahmednagar News: प्रवाशांनी भरलेली बस उलटली; शाळकरी विद्यार्थी जखमी, लेकरांसाठी पालकांचा जीव कासावीस

Ahmednagar Accident News: मिळालेल्या अधिक माहितीनुसार, अहमदनगरमधील संगमनेरमध्ये ही घटना घडली आहे. प्रवाशांनी भरलेली ही बस राहुरीकडून संगमनेरकडे निघाली होती.

Ruchika Jadhav

सचिन बनसोडे

Sangamner Bus Accident:

अहमदनगर येथून अपघाताची एक मोठी घटना समोर आली आहे. एसटी महामंडळाच्या बसचा भीषण अपघात झालाय. बस जागीच पलटी झाल्याने यातील काही शालेय विद्यार्थी जखमी झालेत. जखमी विद्यार्थ्यांवर प्राथमिक उपचार करण्यात आलेत. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, अहमदनगरमधील संगमनेरमध्ये ही घटना घडली आहे. प्रवाशांनी भरलेली ही बस राहुरीकडून संगमनेरकडे निघाली होती. वाटेतच बसचे एक्सेल तुटले. त्यामुळे वाहन चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यामुळे प्रवाशांनी भरलेली बस रस्त्यावर पलटी झाली. अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी न झाल्याने मोठी दुर्घटना टळली आहे.

संगमनेर तालुक्यातील पिंपरणे गावात बस पोहचली त्यावेळी हा अपघात झाला. सकाळची वेळ असल्याने गावातील अनेक विद्यार्थी शाळेत जाण्यासाठी निघाले होते. बस अपघाताची (Accident) माहिती मिळताच मुलांच्या पालकांना ही माहिती कळवण्यात आली. आपल्या लेकरांच्या काळजीने आई वडिलांचा जीव कासावीस झाला होता. जखमी विद्यार्थ्यांना उपचारासाठी संगमनेरला पाठवले आहे.

मुळशीच्या भूकुम गावात मानाच्या बैलालाचा अपघातात जागीच मृत्यू....

मुळशी तालुक्यात मानाच्या बैलाला सिमेंट मिक्सरने चिरडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या अपघातात बैलाचा जागीच मृत्यू झालाय. भूकुम गावात सायंकाळी हा अपघात झालाय. मोती नावाच्या बैलाला संत तुकाराम महाराजांच्या आणि श्रीमंत दगडूशेठ गणपतीच्या रथाची सेवा करण्याचा मानही मिळाला होता.

भविष्यात पुन्हा एकदा हा मान मिळवण्यासाठी मोतीकडून सराव करून घेतला जातो. आज ही हाच सराव सुरू असताना चांदणी चौकाकडून पौडच्या दिशेने सिमेंट मिक्सर निघाले होते. मात्र त्याचवेळी चालकाचा ताबा सुटला अन पुढे निघालेल्या बैलगाडीला त्याने जोराची धडक दिली. या अपघातात मोतीचा जागीच मृत्यू झालाय. त्यामुळं भूकुम गावासह वारकरी संप्रदाय आणि गणेश भक्तांमध्ये हळहळ व्यक्त केली जातीये.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : एकाची मराठीसाठी तळमळ, दुसऱ्याची खुर्चीसाठी मळमळ; एकनाथ शिंदेंचा राज ठाकरेंसाठी सॉफ्ट कॉर्नर

Eknath Shinde: दाढीवरून अर्धाच हात फिरवला, पूर्ण फिरवला असता तर...; ठाकरेंच्या पुष्पा स्टाइल टीकेवर एकनाथ शिंदेंचा पलटवार

Chocolate Brownie Recipe: स्नॅक्स टाइमसाठी झटपट बनवा माउथ वाटरिंग चॉकलेट ब्राउनी, नोट करा ही सोपी रेसिपी

Vijay Melava: राज-उद्धव ठाकरे एकत्र येताच संजय राऊतांचं मविआबाबत मोठं विधान

Sushil Kedia News : सुशील केडियाच्या ऑफिसची तोडफोड केल्यानंतर पहिलीच मोठी कारवाई; मनसे कार्यकर्त्यांना घेतलं ताब्यात, गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT