Balasaheb Thorat Sangram Bhandare Saam tv
महाराष्ट्र

Balasaheb Thorat : तत्व आणि विचारांसाठी बलिदान द्यायला तयार; बाळासाहेब थोरात यांची कीर्तनकार संग्राम भंडारेंच्या व्हिडिओवर प्रतिक्रिया

Ahilyanagar Sangamner News : संगमनेर तालुक्यातील घुलेवाडी येथे कीर्तनात झालेला राडा आणि कीर्तनकार संग्राम भंडारे यांच्या वादग्रस्त व्हिडिओमुळे पुन्हा एकदा वादंग निर्माण झाले आहे

Rajesh Sonwane

सचिन बनसोडे 

संगमनेर (अहिल्यानगर) : जो माणूस नथुराम गोडसेचे नाव घेतो, तो वारकरी संप्रदायाचा असेल का? खरे कीर्तनकार राजकारणात पडत नाहीत. अशा लोकांचा बंदोबस्त करणे ही गृहमंत्र्यांची जबाबदारी आहे. परंतु मी कायदेशीर प्रक्रियेत जाणार नाही. मात्र वेळ आली तर तत्व आणि विचारांसाठी बलिदान द्यायला तयार असल्याचे काँग्रेसचे नेते तथा माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी कीर्तनकार संग्राम भंडारे यांचा वादग्रस्त व्हिडीओवर बोलताना दिली.  

संगमनेर तालुक्यातील घुलेवाडी येथे कीर्तनात झालेला राडा आणि कीर्तनकार संग्राम भंडारे यांच्या वादग्रस्त व्हिडिओमुळे पुन्हा एकदा वादंग निर्माण झाले आहे. बाळासाहेब थोरात यांना उद्देशून आम्हाला नथुराम गोडसे व्हावे लागेल; असे भंडारे महाराज या व्हिडिओत म्हणत आहेत. यावर बाळासाहेब थोरात यांनी पत्रकार परिषद घेत कीर्तनकार संग्राम भंडारे यांचा समाचार घेतला. 

तथाकथित महाराज असून राजकारण करण्यासाठी आलेत 

वारकरी संप्रदायात काही पथ्य आहेत. राज्यघटनेला ठेस पोहचेल असे कीर्तनकारांसह कुणीच बोलू नये. संतांच्या विचारातूनच राज्यघटना तयार झाली आहे. राज्यघटनेवर बोलावे असा अधिकार अशा तथाकथिक महाराजांना बिलकुल नाही. संग्राम भंडारे कीर्तन करताना मूळ अभंग सोडून स्थानिक राजकारणावर बोलत असल्याने काही तरुणांनी त्यांना रोखले. तथाकथित महाराज असून राजकारण करण्यासाठी असे काही लोक वारकरी संप्रदायात घुसले आहेत. हे महाराज आणि इथले लोकप्रतिनिधी कुणाच्या तरी हाताचे खेळणे झाले आहेत. नथुराम गोडसे व्हायचं बोलतांय, असे बलिदान मी आनंदाने घेईल.

मतांसाठी धर्मात वाद 
दरम्यान कीर्तनकारावर हल्ला आणि गाडी फोडल्याचा बनाव करण्यात आला. युवकांवर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले. आमच्या कुटुंबाला वारकरी संप्रदायाची परंपरा आहे. आम्ही भागवत धर्म मानणारे पक्के हिंदू आहोत. आम्ही कुणाचा द्वेष करत नाही, कारण मानवता हाच आमचा धर्म असून देश बंधुभावाने पुढे जावा हे मानणारे आम्ही आहोत. मात्र काही लोकांना वाटतं जाती धर्मात वाद पेटवले की मत मिळतात. विधानसभेला हा प्रयोग झाला होता आणि आता संगमनेरमधून पुन्हा त्याची सुरूवात झाली असल्याचा आरोप थोरात यांनी केलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Election Commission: जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी 13 ऑक्टोबरला आरक्षण सोडत

Hair Care: हेल्दी आणि शायनी केस हवेत? मग 'हा' पदार्थ नक्की ट्राय करा, आठवड्याभरात दिसेल फरक

Fodnicha Bhat Recipe : ऑफिसवरून आल्यावर झटपट बनवा 'असा' चटपटीत फोडणीचा भात, आवडीने खातील सगळे

Gold Price: मागच्या वर्षीचा सोन्याचा दर काय होता?

Bihar Election : निवडणकीआधीच मुख्यमंत्र्यांना मोठा धक्का; फायरब्रँड नेता पक्षाला रामराम ठोकणार

SCROLL FOR NEXT