Sangali विजय पाटील
महाराष्ट्र

Sangali: भर स्टेजवर शिवसेना जिल्हाप्रमुखाचा खिसा कापला...(पहा Video)

शिवसेना जिल्हा प्रमुखाच्या खिशामधून ५० हजार रुपयांच्या नोटांचे बंडल चोरीला गेल्याची धक्कादायक घटना समोर

विजय पाटील

सांगली: शिवसेना जिल्हा प्रमुखाच्या खिशामधून ५० हजार रुपयांच्या नोटांचे बंडल (Note bundle) चोरीला गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ओबीसी मेळाव्याच्या दरम्यान भर व्यासपीठावर ही घटना घडली आहे. ओबीसी नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सांगलीमध्ये नुकताच ओबीसी मेळावा पार पडला आहे. यावेळी वडेट्टीवार स्टेजवर उपस्थित असतानाच हा प्रकार घडला आहे. चोरट्याने सेना जिल्हाप्रमुख (District Head) संजय विभूते यांच्या खिशात नोटा लांबवतानाची घटना (Sangli Theft) कॅमेरामध्ये कैद झाली आहे.

पहा व्हिडिओ-

या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून चोराचा शोध सुरु आहे. सांगली शिवसेना (Shiv Sena) जिल्हा प्रमुख संजय विभूते यांच्या खिशातील ५० हजार रुपयांच्या नोटांचे बंडल चोरट्याने चोरले आहे. सांगलीच्या स्टेशन चौकामध्ये काँग्रेस (Congress) नेते, मदत आणि पुनर्विकास मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या ओबीसी मेळाव्या दरम्यान ही घटना घडल्याचे समोर आले आहे.

स्टेजवर जाऊन चोरट्याने शिवसेना जिल्हाप्रमुखाच्या खिशातून नोटांचे बंडल लांबवण्याची हिंमत केली आहे. व्यासपीठावर असलेल्या गर्दीचा फायदा घेत त्याने नोटा लांबवल्या आहेत. पैसे चोरतानाचा व्हिडीओ समोर आला आहे. शिवसेना जिल्हा प्रमुख संजय विभूते यांनी याविषयी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune : पुण्यात शरद पवारांना जोरदार धक्का, विश्वासू शिलेदार राजकारणातून निवृत्त

Cancer symptoms risk: कधीही कळून येत नाहीत अशी लक्षणं, वाटतात साधी, पण असतात गंभीर; असू शकतो कॅन्सरचा धोका

Maharashtra Live News Update: काँग्रेसचा 80 जागांवरती दावा; 25 तारखेला पहिली यादी येणार

Viral : नवऱ्याची ५००हून अधिक अफेअर्स, वैतागलेल्या बायकोने कॉमिकमधून मांडल्या व्यथा; नेमकं काय प्रकरण? वाचा

Gold Jewellery: सोनार गुलाबी रंगाच्या कागदात सोने गुंडाळून का देतो? यामागचं कारण काय?

SCROLL FOR NEXT