रत्नाआज्जीची दर्दभरी दास्तान; पोटासाठी पंक्चर काढत सावरला संसार विजय पाटील
महाराष्ट्र

रत्नाआज्जीची दर्दभरी दास्तान; पोटासाठी पंक्चर काढत सावरला संसार

याच दुकानावर त्यांच्या तीन मुली पदवीधर झाल्या आणि लग्न करून सासरी गेल्या.

विजय पाटील

सांगली: आयुष्याची वर्षो न वर्षो पाचवीला पुजलेला संसार वयाच्या 70 व्या वर्ष्यात ही सांगलीच्या रत्नाबाई आज्जी पेलत आहेत. आपला अपंग मुलगा आणि पती यांच्या बरोबर संसार करण्यासाठी चक्क त्यांना या वयात पंक्चर काढून संसार चालवावा लागत आहे. रत्नाबाई रामचंद्र जंगम या सत्तरीकडे झुकल्या तरीही त्या स्वाभिमानाने व्यवसाय करत आहेत.

त्याचा सांगलीच्या 100 फुटी रोडवर जंगम पंक्चर दुकान आहे. त्याचा सकाळी 10 वाजता सुरू झालेला दिवस रात्री 8 वाजता थांबतो. पण पंक्चर काढण्याचा हा व्यवसाय पुरुष मंडळी पाहतात पण रत्नाबाई आजींना हा व्यवसाय त्याच्या अडचणीत पोटासाठी आणि कुटुंबासाठी भाकरी देतोय. याच दुकानावर त्यांच्या तीन मुली पदवीधर झाल्या आणि लग्न करून सासरी गेल्या.

रत्नाबाई याचा मोठा मुलगा दीपक ऐन तारुण्यात निघून गेला. आणि त्याने सुरू केलेला पंक्चर व्यवसाय पती रामचंद्र सांभाळू लागले. मात्र त्यांना शारीरिक मर्यादा येऊ लागल्याने ग्राहक परत जाऊ लागले. त्यात घराचा खर्च आणि मिळणारे उत्पन्न कमी होते. त्यात घरात एक अपंग मुलाचे संगोपन. याचा विचार करून रत्नाबाई आज्जीने 20 वर्षाआधी पंक्चर काढण्याचं हळूहळू शिकून घेतले. आणि आपल्या पती बरोबर व्यवसाय सुरू ठेवला आहे. त्यांनी परिसरातील दुचाकी, तीन चाकी, रिक्षाचालक रत्नाआज्जीने जोडले आहेत. आणि आजी कडे हे लोक आपली गाडी दुरुस्ती साठी घेऊन येत असतात. रत्नाआज्जी ला दिवसाकाठी 300 ते 350 रुपये मिळून जातात. त्यातून त्या आपला संसार चालवत आहेत.

रत्नाआज्जीना पाच मुलं तीन मुली आणि दोन मुले. एक मुलगा देवाघरी गेला आणि एक अपंग, तर तीन मुलीची लग्न झाली आहेत. त्यामुळे रत्नाआज्जी त्याचे पती आणि एक अपंग मुलगा असे तिघेच घरात राहतात. पण घर कसे चालायचे म्हणून रत्नाआज्जी आणि त्याचे पती वयाच्या 70 मध्ये ही पंचर काढून आपला संसार चालवत आहेत. त्याची शासनाकडे एकच अपेक्षा आहे. ती म्हणजे अपंग मुलाला आधार कार्ड उपलब्ध होत नाही. आणि शासनाच्या काही सवलती पासून त्या वंचित आहेत. थोडासा हातभार मिळवा त्या हीच अपेक्षा आहे.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: संध्याकाळ सहावाजेपर्यंत आंदोलनस्थळ रिकामे करा; उच्च न्यायालयाचे आदेश

Satara News : सातारा डॉक्टर महिला मृत्यू प्रकरणात ट्विस्ट, पीडितेच्या हात आणि पत्रावरील हस्ताक्षर जुळत नाही? ठाकरे गटाचा मोठा दावा

'१ वाजता आली, चेहऱ्यावर चिंता अन्..' 'त्या' रात्री डॉक्टर तरूणीसोबत काय घडलं? हॉटेल मालकानं सर्वच सांगितलं

Badlapur Crime: साताऱ्यानंतर बदलापुरात खळबळ; डॉक्टर महिलेवर प्राणघातक हल्ला

India vs Australia: ऐन रंगात आलेल्या मॅचमध्ये पावसाचा व्यत्यय; वरुणराजाच्या गोंधळानं पहिल्या टी२० सामना रद्द

SCROLL FOR NEXT