गोपीचंद पडळकर 
महाराष्ट्र

Sangali : पालकमंत्रींना सत्तेचा माज व मस्ती आलीय : गोपीचंद पडळकर

विजय पाटील

सांगली : जिल्हा नियोजन समिती मार्फत जिल्ह्यात किती पैसे खर्च झाले अद्याप ही माहिती दिली गेली नाही. तसेच बैठकीत एका आमदाराला एक एका आमदाराला एक न्याय का? असे विचारले असता; आम्ही बघतो पाहतो असे उत्तर पालकमंत्री देतात. खरं तर पालकमंत्री यांना सत्तेचा माज आणि मस्ती असल्याने ते नीट उत्तर देत नाहीत. अशी टीका भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली. ते सांगलीमध्ये जिल्हाधिकारी कार्यलय येथे बैठकी नंतर बोलत होते..

सांगलीच्या जिल्हाधिकारी कार्यलयात जिल्हा नियोजन बैठक झाली. या बैठकीत पालकमंत्री जयंत पाटील, विश्वजित कदम, खासदार आमदार शासकीय अधिकारी उपस्थित होते.

महाआघाडीच्या नेत्यांना विकास कामांसाठी आमदारना जास्त पैसे दिले जात आहेत. मात्र आम्हाला कमी दिले जातात. यावर गोपीचंद पडळकर कडाडले आणि बैठकीतून बाहेर निघून आले. पालकमंत्री आणि या मिटिंगचा निषेध केला आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत त्यांनी सर्वाना समान न्याय द्यायला हवा असे पडळकर म्हणाले.

पवारांना लगावला टोला

अजित पवार काय म्हणतात याला महत्व नाही. आता आमच्याकडे एजन्सी का छापा टाकत नाहीत. एजन्सीकडे काही कागदपत्रे असतील त्यामुळे छापा टाकला असेल. असा टोला पवार यांना पडळकर यांनी लगावला. महापुराचा अद्यापपर्यंत काही ठिकाणी पैसे दिले गेले नाहीत. आटपाडी तालुक्यातील ७ गावांना अद्याप मदत मिळाली नाही.

तर एसटी कर्मचारी आंदोलन करतील

एसटी कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवा अन्यथा तोंडावर आलेल्या दसरा, दिवाळीमध्येच एसटी कर्मचारी आंदोलन करतील. जनतेचे जे हाल होतील त्याला राज्य सरकार जबाबदार राहील. एसटी महामंडळामधील कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावरून भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांचा राज्य सरकारला इशारा दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Blood Pressure : केळी ब्लड प्रेशरसाठी का फायदेशीर असतात का?

Maharashtra News Live Update: मनोज जरांगे पाटील यांच्या आझाद मैदान आंदोलनाला पोलिसांनी पुन्हा परवानगी नाकारली...

मुख्यमंत्र्यांची खुर्ची धोक्यात? मित्र पक्षाने सोडली साथ; राजकारणात खळबळ

Celebrates Ganpati 2026 : फुलांची सजावट, मोदकांचा नैवेद्य अन् ढोल ताशांचा गजर; सेलिब्रिटींच्या घरी गणरायाचे आगमन | VIDEO

IAS Officer Transfer: बदल्यांचा धडाका सुरूच! 14 आयएएस अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या; कुणाची कुठे नियुक्ती?

SCROLL FOR NEXT