car 
महाराष्ट्र

भन्नाट..मुलाचा कारसाठी हट्ट अन्‌ वडिलांनी साकारली मिनी कार

विजय पाटील

सांगली : देशी जुगाड लावून एखाद्या वस्तूपासून भलतीच गोष्ट करणाऱ्यांची काही कमी नाही. अशीच जुगाड लावून तयार केलेली चारचाकी सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. मुलाने कारचा हट्ट केल्याने फॅब्रिकेशनचा व्यवसाय करणाऱ्या वडिलांनी स्वत:च भंगारामधील टाकावू वस्तूंमधून एकेक वस्तू जमवत अफलातून कार तयार केली आहे. सांगलीमधील देवराष्ट्रे येथील दत्तात्रय लोहार असे कार तयार करणाऱ्या अवलियाचे नाव आहे. (sangali-news-child's-car-demand-and-the-father-made-a-mini-car)

कार घेणे परवडणारे नसल्‍याने जुगाड

मुलाने कारचा हट्ट धरला होता. मात्र नवी किंवा सेकंड हँड कार (Car) घेणे परवडणारे नसल्याने त्यांनी स्वत:च कार तयार करण्याचे ठरवले. त्यानुसार त्यांनी एकेक पार्ट गोळा करून त्याआधारे ही कार तयार केली. जीपसारखा आकार, रिक्षाची चाके, दुचाकीचे इंजीन आणि शेतातील इंजनाची टाकी अशा वस्तू जमवून त्यांनी ही रिक्षापेक्षाही लहान असलेली चार आसनी कार तयार केली आहे. मुलाने हट्ट केल्याने आपल्याला गाडी तयार करण्याची प्रेरणा मिळाल्याचे त्यांनी सांगितले.

मायलेजही भारी

सांगली (Sangali) येथील दत्तात्रय लोहार या कारच्या माध्यमातून अनेक ठिकाणी फिरत असतात. दरम्यान, ही अजब कार पाहिल्यावर लोकांना आश्चर्य वाटल्याशिवाय राहत नाही. कार तयार करण्यासाठी पन्नास ते साठ हजार रुपये खर्च आल्याचे दत्तात्रय लोहार यांनी सांगितले. तसेच ही कार एक लिटर पेट्रोलमध्ये (Petrol) सुमारे ४० ते ४५ किमी अंतर कापते. तसेच या कारमधून ड्रायव्हरसह एकूण चार जण प्रवास करू शकतात.

६० हजारात कार तयार

या कारला दुचाकी गाडीचे इंजिन वापरले आहे. तर पुढचा भाग हा जीपता वापरला आहे. स्टेअरिंग रॉड मात्र स्वत: तयार केला. तसेच चाके रिक्षाची वापरली. एकूण ५० ते ६० हजारांमध्ये ही कार तयार झाली. दरम्यान, या कारचा व्हिडीओ गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत आहे. तसेच या अजब कल्पनेचं कौतुक होत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bigg Boss Marathi: बिग बॉसच्या ५व्या सीझनची Happy Ending; मात्र 'या' सदस्याचे केले भरभरुन कौतुक..

Bigg Boss Marathi 5 Jahnavi Killekar : बिग बॉसमधून बाहेर पडल्यानंतर जान्हवीची पहिली पोस्ट म्हणाली, "७० दिवसाच्या प्रवासानंतर..."

IND vs BAN: 0,0,0,0,0,0..टीम इंडियाची स्पीड मशीन जोमात; Mayank ने पहिल्याच ओव्हरमध्ये नोंदवला मोठा रेकॉर्ड

Pune Crime : ड्रग्स, कोयते गँग, हिट अॅण्ड रन; पुणे बनलंय क्राईम कॅपिटल

Bigg Boss Marathi 5 Winner: अखेर तो क्षण आला! 'सुरज'चा गुलीगत विजय, ठरला बिग बॉस मराठी 5 व्या पर्वाचा विनर; मिळाले 'इतके' लाख रुपये

SCROLL FOR NEXT