Islampur Accident News एोोस ऊ
महाराष्ट्र

Sangali Accident News : थाटामाटात लग्न झालं, देवदर्शनासाठी गेले, पण परतलेच नाही; नवदाम्पत्यासोबत घडली भयानक घटना

Islampur Accident News : सांगली जिल्ह्यात काळीज पिवटळून टाकणारी घटना घडली. देवदर्शनावरून परतत असणाऱ्या कुटुंबावर काळाने घाला घातला.

साम टिव्ही ब्युरो

Sangali Accident News : सांगली जिल्ह्यात काळीज पिवटळून टाकणारी घटना घडली. देवदर्शनावरून परतत असणाऱ्या कुटुंबावर काळाने घाला घातला. समोरून भरधाव वेगात येणाऱ्या ट्रकने कारला जोरदार धडक दिली. या धडकेत नवदाम्पत्याचा जागीच मृत्यू झाला. तर आई-वडील गंभीर जखमी झाले. (Latest Marathi News)

त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे. अंगावर काटा आणणारी ही थरारक घटना कर्नाटक राज्यातील हलूर जवळील जत-जांबोटी महामार्गावर घडली. या घटनेमुळे परिसरातून मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.

इंद्रजीत मोहन ढमणगे (वय २९ वर्ष) आणि कल्याणी इंद्रजीत ढमणगे (वय २४ वर्ष, राहणार इस्लामपूर ) असं मृत्यूमुखी पडलेल्या नवदाम्पत्याचं नाव आहे.या अपघातात मृत इंद्रजीतचे आई-वडील जखमी झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, इस्लामपूर (Sangali) येथील इंद्रजीत यांचा १८ फेब्रुवारी रोजी कल्याणी हिच्याशी विवाह झाला होता. अगदी थाटामाटात हा विवाह सोहळा संपन्न झाला. लग्नानंतर या नवदाम्पत्यांनी आपल्या कुलदैवत असणाऱ्या कर्नाटक राज्यातल्या शाकांभरी देवीच्या दर्शनासाठी जाण्याचे ठरवले.

त्यानुसार इंद्रजीत आणि कल्याणी आणि इंद्रजित याचे आई-वडील देवदर्शनाकरिता गेले होते. देवीचे दर्शन घेवून परतत असताना समोरून येणाऱ्या भरधाव ट्रकने इंद्रजीत यांच्या कारला समोरून जोरदार धडक (Accident) दिली. या धडकेत इंद्रजित आणि कल्याणीचा जागीच मृत्यू झाला.

तर इंद्रजीतचे वडील मोहन व आई मिनाक्षी हे गंभीर जखमी झाले आहेत.मृत कल्याणी यांचे माहेर इचलकरंजी आहे, तर इंद्रजीत हे मुंबई येथे टीसीएस कंपनीत नोकरीस होते. रविवारी पहाटे इस्लामपूर येथे नवदाम्पत्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. नवदाम्पत्यावर अचानक काळाने घाला घातल्याने परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Life Hacks : परफेक्ट सकाळ बनवायचीये ? मग ही एक सवय आजच लावा! नाहीतर सकाळी सकाळी होइल प्रचंड धावपळ

Maharashtra News Live Update: कोथरुडमध्ये १००० हून अधिक नवजात बालकांचा बालदिन सोहळा

पवारांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, विलिनीकरणासाठी पवारांवर आमदार-खासदारांचा दबाव?

Asia Cup Final : पाकिस्तान चारमुंड्या चित, भारतानं आशिया चषकावर कोरलं नाव, शेवटच्या चेंडूवर सनसनाटी विजय

BJP MLA Video: खांद्यावर kiss केलं नंतर दातात कान पकडला! भाजप आमदाराच्या व्हिडिओनं राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT