Sandipan Bhumre-Uddhav Thackeray Saam TV
महाराष्ट्र

Sandipan Bhumre : संदीपान भुमरेंची चौफेर फटकेबाजी; एकनाथ शिंदेंमुळे उद्धव ठाकरेंचे सर्व आजार पळाले

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे टीव्ही चालू झाल्यानंतर दिसायचे आणि टीव्ही बंद झाला तेही बंद व्हायचे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

औरंगाबाद : मुंबईतील दसरा मेळाव्यासाठी शिंदे गटाच्या मंत्री आणि आमदारांचा मेळावा औरंगाबाद येथे पार पडला. या मेळाव्यात पालकमंत्री संदिपान भुमरे यांनी जोरदार फटकेबाजी करत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे केवळ टीव्हीवर दिसायचे. एकनाथ शिंदेंमुळे उद्धव ठाकरे यांची मानदुखी, पाठदुखी सर्व आजार दूर झाल्याची टीका संदीपान भुमरे यांनी केली आहे. कृषीमंत्री अब्दुल सत्तार, आमदार संजय शिरसाट, आमदार प्रदीप जैस्वालांसह इतर आमदार या मेळाव्याला उपस्थित होते.

संदीपान भुमरेंनी म्हटलं की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे टीव्ही चालू झाल्यानंतर दिसायचे आणि टीव्ही बंद झाला तेही बंद व्हायचे. महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री जनतेचा असावा लागतो. जनतेत काम करणारा असावा लागतो. मी अडीच वर्ष त्यांच्यासोबत काम केलं. मी कॅबिनेट मंत्री असताना मुख्यमंत्री केवळ पाच-सहा वेळा मंत्रालयात आले. बाकी सर्व कॅबिनेट ऑनलाईन झाली, असा टोला संदीपान भुमरेंनी लगावला. (Breaking Marathi News)

एकनाथ शिंदे यांनी उठाव केल्यावर उद्धव ठाकरेंचा बेल्ट गेला, खुर्ची गेली. त्यांना मोठा डॉक्टर भेटला आहे. आता ते म्हणतात का माझं ऑपरेशन झालं, मान दुखते असं म्हणत नाहीत. एकनाथ शिंदेंमुळे तुमचा किती फायदा झाला, घरातील सगळे आजार गायब झाले. एकनाथ शिंदेंमुळे तुमचा तेजस बाहेर आला, आदित्य बाहेर आला, अशी टीकाही त्यांनी केली.

चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवेंनी जिल्ह्याचं वाटोळं केलं. एक रस्ता केला नाही या खैरेंनी. महापालिका निवडणुकीत खैरे मतं मागायला गेले तर लोक दरवाजा बंद करतील. अडीच वर्षात खैरेंना कुणी विचारायचे नाहीत. खैरे म्हणायचे तुम्ही उद्धव ठाकरेंना सांगा, मला मातोश्रीवर येऊ द्या. अनिल परब, देसाई हे मातोश्रीचे गोचीड आहेत. गोचीडसारखे रक्त पिऊन टंम झाले आहेत, अशी चौफेर टीका संदीपान भुमरेंनी केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gayatri Datar Mangalsutra Design: शिव-शक्तीचं प्रतीक आणि सौभाग्याचं लेणं! गायत्री दातारच्या 'दोन वाट्यांच्या' मंगळसूत्राने वेधलं लक्ष

Maharashtra News Live Update: सोलापुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची दुपारी सभा

PM Modi Plays Football: प्रचार थांबताच पंतप्रधान मोदी सिक्कीममध्ये, मुलांसोबत खेळले फुटबॉल, पाहा फोटो

BOB Recruitment: कोणतीही परीक्षा नाही, थेट बँक ऑफ बडोदात नोकरी; भरघोस पगार मिळणार; अर्ज कधीपर्यंत करता येणार? वाचा

Gold Rate Today : सोन्याच्या दरात मोठी घसरण, प्रति तोळा इतक्या रूपयांवर आले, वाचा 24k, 22k, 18k सोन्याचे दर

SCROLL FOR NEXT