sushma andhare  saam tv
महाराष्ट्र

"सुषमा अंधारे पैठणमध्ये संध्याकाळी आल्या; त्यांना काय विकास दिसणार"

पालकमंत्री संदिपान भुमरे यांचे अंधारेंवर टीकास्त्र

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

नवनीत तापडिया

औरंगाबाद - सुषमा अंधारे या पैठणमध्ये (Paithan) संध्याकाळी आल्या, त्यांना काय विकास दिसणार? त्या मतदारसंघात अर्ध्या तास थांबल्या, स्थानिक नेत्यांनी टीका केली असती तर ठीक होत असे म्हणत पालकमंत्री संदिपान भुमरे यांनी त्यांना प्रत्युत्तर दिले आहे.

सुषमा अंधारे (Shusma Andhare) यांनी किती सभा घेतल्या त्यांच्या सभेला किती गर्दी आली तर काय होणार यांनी अडीच वर्षात काहीही केले नाही, आम्ही 24 तास लोकांची काम करतो नुसत्या सभा घेऊन काहीही होत नाही असेही भुमरे म्हणाले.

सुषमा अंधारे यांना उत्तर देताना भुमरे यांनी यावेळी केलेल्या विकास कामांचा पाढाच वाचून दाखवला. काल सुषमा अंधारे यांनी महाप्रबोधन यात्रेत पैठण येथे संदिपान भुमरे यांच्यावर विकास कामांवरून जोरदार टीका केली होती याला आता भुमरे यांनी प्रत्युत्तर दिलंय.

संदिपान भुमरे यांचे दानवेंना प्रतीप्रश्न

काल पैठण येथे महाप्रबोधन यात्रेत विरोधी पक्षनेते आमदार अंबादास दानवे यांनी पोलिसांना उद्देशून वादग्रस्त वक्तव्य केले होते. यावर आता पालकमंत्री संदिपान भुमरे यांनी त्यांना प्रतिप्रश्न करत अंबादास दानवे यांना नेमके काय म्हणायचे आहे, हे त्यांनी उघडपणे बोलावं. पोलीस पगार भुमरेंचा घेतात की शासनाचा असे ते का म्हणाले हेही त्यांनी उघडपणे बोलावं अस प्रत्यूत्तर भुमरेंनी दानवेंना दिलं आहे. अंबादास दानवे हे विरोधी पक्ष नेता आहेत त्यांना बोलण्यासाठी विरोधी पक्षनेता केले. विरोधी पक्षनेता असल्याने ते भुमरे यांना काही चांगलं म्हणणार नाहीत असा मुश्किल टोलाही त्यांनी लगावला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज चौदावा दिवस, प्रकृती खालावली

Bank Closed : आजपासून पुढील ४ दिवस बँका राहणार बंद, जाणून घ्या काय आहे कारण

साताऱ्यात खळबळजनक प्रकार! भाजपच्या नेत्यावर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, धक्कादायक कारण समोर

Cancer warning signs: शरीरातील छोट्या बदलांकडे दुर्लक्ष करणं पडेल महागात; कॅन्सरचे संकेत ओळखण्यासाठी करा या ५ तपासण्या

Weather Update : आजपासून राज्यात पावसाचा जोर वाढणार; विदर्भ, मराठवाड्यात मुसळधार पावसाचा अंदाज

SCROLL FOR NEXT