Beed News Saam tv
महाराष्ट्र

Beed News: बीडमध्ये क्षीरसागर काका-पुतणे पु्न्हा आमने सामने; बाजार समिती निवडणुकीमध्ये दिग्गज नेत्यांच्या प्रतिष्ठा पणाला

Beed News: बीडच्या कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूकीत आमदार संदीप क्षीरसागर आणि जयदत्त क्षीरसागर हे काका पुतणे पुन्हा एकदा आमने सामने आले आहेत.

विनोद जिरे

Beed News: बीडच्या कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूकीत आमदार संदीप क्षीरसागर आणि जयदत्त क्षीरसागर हे काका पुतणे पुन्हा एकदा आमने सामने आले आहेत. काका जयदत्त क्षीरसागर यांना कोंडीत पकडण्यासाठी आमदार संदीप क्षीरसागरांनी 5 पक्षांना सोबत घेऊन काकांची कोंडी केली आहे. तर दुसरीकडे परळीत मुंडे बहीण भावात संघर्ष निर्माण झाला आहे. (Latest Marathi News)

बीड जिल्ह्यातील 8 कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकांसाठी उद्या मतदान होणार आहे. या निवडणुका सर्वच नेत्यांनी प्रतिष्ठेच्या केल्या आहेत. मागील पंधरा दिवसांमध्ये निवडणुकीच्या प्रचारानिमित्त आरोप प्रत्यारोप पाहायला मिळाले.

आता प्रचाराच्या तोफा थंडावल्या असून अस्तित्व टिकवण्यासाठी दिग्गजांपुढे आव्हान असणार आहे. या निवडणुकीत काका जयदत्त क्षीरसागरांनी बोगस मतदार नाव नोंदविण्याचा थेट आरोप संदीप क्षीरसागर यांनी केला.

तर काका जयदत्त क्षीरसागर यांनी टक्केवारीवरून पुतण्या संदीप क्षीरसागर यांना लक्ष केले. प्रत्येक बाबतीत तोड पाणी आणि वसुली केली जाते. मलाही पैसा खाता आला असता मात्र तसं केले नाही. असं म्हणत जयदत्त क्षीरसागरांनी पुतण्यावर टीकास्त्र सोडले. (Maharashtra Political News)

दरम्यान, आजपर्यंत विधानसभा, खासदारकी या निवडणुकीत पाहायला मिळणारे राजकारण आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत अनुभवायला मिळत आहे. उद्या मतदान होणार असून 29 तारखेला निकाल हाती येणार आहेत. त्यामुळे हे सर्व नेते आपली सत्ता राखतात की नव्यांना यात संधी मिळते ? हे पाहणं महत्त्वाच असणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

देवेंद्र फडणवीस पंतप्रधान व्हावेत! राज्यातील बड्या नेत्याची इच्छा; राजकीय चर्चांना उधाण

बदल्यांचा धडाका सुरूच! 31 IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; पोलिस दलात मोठी खळबळ

Maharashtra News Live Update: राहुल गांधी मांजरीत विद्यार्थ्यांच्या भेटीला येणार

Shocking: गेस्ट हाऊसच्या खोलीत ५ जणांचा संशयास्पद मृत्यू, एकाच कुटुंबातील सदस्यांसोबत नेमकं काय घडलं?

UP Accident News : महामार्गावर भीषण अपघात; डंपरमध्ये अडकून ५० मीटर फरफटत गेली कार, आई-वडिलांसह दोन मुलांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT