Audio Clip: अधिकाऱ्यांचं वाळू माफियांशी लैंगिक शक्तीवर्धक गोळ्यांसाठी साटंलोटं लक्ष्मण सोळुंके
महाराष्ट्र

Audio Clip: अधिकाऱ्यांचं वाळू माफियांशी लैंगिक शक्तीवर्धक गोळ्यांसाठी साटंलोटं

मेडिकल स्टोअर्समध्ये "चॉकलेट" या सांकेतिक नावाने या गोळ्यांची विक्री केल्या जात असल्याची माहिती समोर येत आहे.

लक्ष्मण सोळुंके

जालना: अवैधरित्या गर्भपात आणि गुंगीकारक औषधी प्रकरणी रात्री उशीरा अंबड पोलिसांनी जगळगाव आणि बुलढाणा जिल्ह्यातील तीन जणांना ताब्यात घेतले असून त्यांना आज न्यायालयासामोर हजर करण्यात आल्याने न्यायालयाने त्यांची चार दिवसाच्या पोलिस कोठडीत रवानगी केली आहे. या प्रकरणी अंबड पोलिसानी संदीप लिंबा पाटील, समाधान भानुदास पाटील या दोन आरोपीना जळगाव शहरातून तर स्वप्नील उर्फ धनु विलासराव देशमुख याला बुलढाणा जिल्ह्यातील चिखली शहरातून अटक केली आहे.

हे आरोपी या सर्व औषधाचे स्टोकिस्ट असल्याची माहिती समोर येत असून राज्यात ऑनलाइन पद्धतीने पैसे घेऊन अवैधरित्या मेडिकल स्टोअर ला ही औषधं पुरवीत असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी मोठं मोठे रॅकेट असण्याची शक्यता वर्तविली जात असून या प्रकरणी अधिक तपास अंबड पोलिसांकडून केला जात आहे. त्यामुळे या प्रकरणाचे धागेडरे राज्य भर परल्याची शक्यता वर्तविवली जात आहे.

जालन्यातील महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना वाळू माफियांकडून या गोळ्यांचा पुरवठा केला जात होता अशी धक्कादायक बाब वाळू माफियाकडून व्हायरल झालेल्या ऑडियो क्लिप मधून सामोर आली आहे. मेडिकल स्टोअर्समध्ये "चॉकलेट" या सांकेतिक नावाने या गोळ्यांची विक्री केल्या जात असल्याची माहिती समोर येत आहे. व्हायरल झालेल्या या ऑडियो किल्पमध्ये या गोळ्यांचा उल्लेख करताना आढळून आला आहे. व्हायरल क्लिप सामोर आल्याने ही धक्कादायक बाब सामोर आली आहे, आता या प्रकरणी चौकशी झाल्यास यात मोठे रॅकेट समोर येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

■ काय आहे नेमका प्रकार

गर्भपात, गुंगीकारक औषधांचा अवैधरित्या खरेदी- विक्रीच्या उद्देशाने या प्रकरणी २ जणांविरुद्ध अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या तक्रारी वरून अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मागील काही दिवसात दुसरा गुन्हा दाखल झाल्याने, जिल्ह्यात अवैधरित्या गर्भपात आणि गुंगीकारक औषध विक्रीचे रॅकेट असण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

अंबड परिसरात अवैधरित्या गर्भपात आणि गुंगीकारक औषधाची विक्री करणारे २ जणांना दुचाकीवरून, विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन जालना कार्यालयाच्या औषध निरीक्षकांना खबऱ्यामार्फत मिळाली होती. अंबड- जालना महामार्गावरील पारनेर फाटा परिसरात दुचाकी वरून, दोन काळ्या बॅग घेऊन जात असताना त्यांच्या ताब्यातील बॅगची झडती घेतली असता. त्यांच्या बॅगमध्ये गर्भपातासंबंधीत तसेच गुंगीकारक आणि पुरुषांचे कामवासना वृद्धिंगत करणाऱ्या औषधीचा साठा मोठ्या प्रमाणात आढळून आले.

या बाबद अधिक चौकशी केली असता, औषधीचे खरेदी विक्रीसाठीचा परवाना नसल्याचे धक्कादायक बाब सामोर आली आहे. औषध विक्रीचा कोणतेही परवानगी नाही. ही अवैध रित्या विक्री केल्या जात होती.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai T20 League: टी-२० लीगमध्ये मराठा संघाची 'रॉयल' कामगिरी; सलग दुसऱ्यांदा जेपेतपदावर कब्जा

अनुसूचित जातीत उपवर्गीकरण करायला हरकत नाही; रामदास आठवलेंनी सांगितलं कारण, VIDEO

IND vs AFG: शुबमन गिलसमोर अफगाण गोलंदाजी फेल; टीम इंडियाचा पहिल्या वनडेत शानदार विजय

Yavatmal Crime: खासगी रुग्णालयात धारदार शस्त्राने हल्ला करत नर्सची हत्या; यवतमाळ हादरलं

वीज मीटर ४८ तासांत बदलणार; 'महावितरण'कडून ग्राहकांना अल्टिमेटम? काय आहे मेसेजमागचं सत्य?

SCROLL FOR NEXT