Samruddhi mahamarg Vidarbha Travels Bus Accident Update: Saam TV
महाराष्ट्र

Buldhana Bus Accident: विदर्भ ट्रॅव्हल्स अपघातासंदर्भात मोठी अपडेट; DNA अहवाल प्राप्त, सर्व मृतकांची ओळख पटली

Samruddhi Mahamarg News: समृद्धी महामार्गावरील सिंदखेड राजा तालुक्यातील पिंपळगाव खुटा परिसरात विदर्भ ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात झाला होता.

साम टिव्ही ब्युरो

संजय जाधव, साम टीव्ही बुलढाणा

Samruddhi mahamarg Vidarbha Travels Bus Accident Update: समृद्धी महामार्गावरील सिंदखेड राजा तालुक्यातील पिंपळगाव खुटा परिसरात विदर्भ ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात झाला होता. या अपघातात जवळपास २५ प्रवाशी जळून खाक झाल्याची दुर्दैवी घटना घडली होती. आगीत मृतदेह पूर्णपणे होरपळल्याने त्यांची ओळख पटवणे कठीण झाले होते. डीएनए अहवालानंतर आता सर्व मृतांची ओळख पटली आहे.

अपघातात मृत्युमुखी पडलेल्या 'डीएनए' अहवाल प्राप्त झाला असून सर्व प्रवाशांची ओळख पटली असल्याची माहिती तपास अधिकारी प्रदिप पाटील यांनी दिली आहे. याशिवाय घटनास्थळीच्या अवशेषांचे फॉरेन्सिक अहवाल देखील प्राप्त झाल्याची माहिती देखील पूरक यांनी दिली.

अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना मृत्यू प्रमाणपत्र देण्यात आले असून, 'क्लेम' करणे व अन्य कार्यवाहीसाठी ही प्रमाणपत्रे सहाय्यक ठरणार आहेत, अपघात स्थळ परिसरातील अवशेष, वस्तू, उपकरणे, सुटे भाग आदींची 'फॉरेन्सिक' चाचणी करण्यासाठी अमरावतीला पाठविण्यात आले होते.

त्याचा अहवालही प्राप्त झाल्याचे प्रदीप पाटील यांनी सांगितले आहे. दरम्यान, घटनेनंतर दुर्घटनाग्रस्त विदर्भ ट्रॅव्हल्सचे 'फायर ऑडिट' करण्यात आले होते, एका खाजगी संस्थेतर्फे ही कार्यवाही करण्यात आल्यावर त्याचा अहवाल थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सादर करण्यात आला आहे.

मात्र निर्णायक असलेला बुलढाणा उप प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांचा अहवाल अजून प्राप्त झालेला नाही. यात परिवहन विभागाच्या पथकाने केलेली तपासणी, वाहनात करण्यात आलेले 'मोडीफिकेशन' नियमानुसार होते का? वाहनाचे आणिबाणीच्या प्रसंगात वापरण्यात येणाऱ्या 'एक्सिट डोअर' ची स्थिती याची कारणमीमांसा अपेक्षित आहे हा अहवाल खटल्यातही महत्वाचा घटक ठरू शकतो.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

अजित पवारांच्या नावाने संस्था नोंदणीसाठी कुटुंबीयांची पूर्वपरवानगी बंधनकारक; जिल्हा कार्यालयांना निर्देश

Maharashtra Live News Update : प्रमाणपत्र वाटपाची सरकारची जबाबदारी; मराठा आरक्षणावरून जरांगे पुन्हा सरकारवर बरसले

महाराष्ट्राला आखाती युद्धाची धग, राज्यातील उद्योगधंदे 'गॅस' वर

साम टीव्हीचं 'ऑपरेशन सिलिंडर', सगळ्यात मोठ्या रॅकेटचा 'साम'वर भांडाफोड

मुंबईत पुन्हा हिट अँड रन; वाळूने भरलेल्या ट्रकने तिघांना चिरडलं, अपघातानंतर चालक फरार

SCROLL FOR NEXT