samruddhi mahamarg accident news 
महाराष्ट्र

Samruddhi Mahamarg Accident : समृद्धी महामार्गावर पुन्हा अपघात, एकाच कुटुंबातील ३ जणांचा मृत्यू

Samruddhi Accident News : मुलगी आणि चालक जखमी झाले असून त्यांच्यावर सिंदखेड राजा येथील शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे.

Namdeo Kumbhar

Samruddhi Mahamarg Accident News : हिंदुहृदयसम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावर पुन्हा एकदा अपघाताची घटना घडली आहे. पुण्यावरुन जाणाऱ्या गाडीचा सिंदखेडराजा जवळ भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. प्राथमिक माहितीनुसार, या भीषण अपघातामध्ये तीन जणांचा जागेवरच मृत्यू झालाय. दोन जण गंभीर जखमी आहेत. जखमीवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून अधिक तपास सुरु आहे.

मृत एकाच कुटुंबातील असून त्यामध्ये आईवडील आणि मुलाचा समावेश आहे. त्यांची मुलगी आणि चालक जखमी झाले असून त्यांच्यावर सिंदखेड राजा येथील शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे.

ऐन दिवाळीमध्ये समृद्धी महामार्गावर भीषण अपघाताची घटना घडली आहे. या अपघातामध्ये एकाच कुटुंबातील तीन जणांचा मृत्यू झााय. मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यावरुन हे कुटुंब निघाले होते. सिंदखेडराजा जवळ कारने धावत्या ट्रकला मागून धडक दिल्याने हा भीषण अपघात घडला आहे. या अपघातामध्ये कुटुंबातील तीन जणांचा मृत्यू झालाय. तर दोन जण जखमी झाले आहेत. अपघात इतका भीषण होता की कारचा चुराडा झालाय. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. मृतकामध्ये पती, पत्नी व चिमुकल्या मुलाचा समावेश आहे.

बुलढाण्यातील सिंदखेडराजा जवळील पिंपळखुटा गावाच्या शिवारात समृद्धी महामार्गावर कारचा भीषण अपघात झाला. या अपघातमध्ये एकच कुटुंबातील तीन जणांचा मृत्यू झालाय. दोन जण गंभीर जखमी असून त्यांना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलेय. मिळालेल्या माहितीनुसार, पुणे येथून वरुड येथे इंडिका कारने कुटुंब जात होते. पिंपळखुटा गावाजवळ भरधाव कारने चालत्या ट्रकला मागून धडक दिली. या अपघातामध्ये पती, पत्नी आणि चिमुकल्याचा मृत्यू झालाय. जखमी दोन जणांना सिंदखेडराजा येथील ग्रामीण रुग्णाल्यात उपचारासाठी दाखल करण्यात आलेय. या अपघाताची माहिती मिळताच स्थानिकंनी तात्काळ धाव घेतली. पोलिसांनाही पाचारण करण्यात आले. तात्काळ मदतकार्य करण्यात आले. जखमींवर उपचार सुरु आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदी अजित पवारांची निवड

Thackeray Brothers Reunion: ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याने विरोधकांची पायाखालची वाळू सरकली – शिवसैनिकांची प्रतिक्रिया|VIDEO

Actress Father shot: प्रसिद्ध अभिनेत्रीच्या वडिलांवर भरदिवसा गोळीबार; नेमकं काय घटलं? वाचा घटनाक्रम

Devendra Fadnavis : राज ठाकरेंचे आभार, बाळासाहेबांचा आशीर्वाद मलाच मिळाला; देवेंद्र फडणवीस असं का म्हणाले?

Amarnath Yatra Bus Accident : अमरनाथ यात्रेला जाणाऱ्या भाविकांच्या वाहनांचा भीषण अपघात; 5 बस एकमेकांना आदळल्या, परिसरात खळबळ

SCROLL FOR NEXT