मुंबई-नागपूरला जोडणाऱ्या ‘समृद्धी महामार्ग हा लुटीचा महामार्ग बनला आहे. या मार्गावर दरोडेखोरांनी अक्षरश: धुमाकूळ घातलाय...27 ऑगस्टला समृद्धीवर तब्बल 3 कुटुंबियांना धाक दाखवून लुटल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय...मध्यरात्री दीड तास लुटारूंच्या टोळक्यांनी धावत्या वाहनांचे टायर पंक्चर करत लाखो रुपयांची लुटमार केलीय... छत्रपती संभाजीनगरमधील अॅड श्रीकांत मिश्रा आपल्या कुटुंबियांसह समृद्धीवरून मुंबईच्या दिशेनं जात असताना सिन्नर परिसरात रात्री पावणेबाराच्या सुमारास गाडीवर लोखंडी वस्तु आदळली आणि त्यांची गाडी पंक्चर झाली....आणि वेळ साधत 10 ते 12 जणांच्या टोळक्यांनी त्यांना लुटलं....
या घटनेत दरोडेखोरांनी अॅड श्रीकांत मिश्रा यांच्या कुटुंबियांकडून तब्बल १८ लाखांचा एवज लुटला....
दरोडेखोरांची लुटमार
5 सोन्याच्या अंगठ्या
2 सोन्याचे ब्रेसलेट
2 सोन्याच्या चेन
2 सोन्याच्या बांगड्या
2 पाटल्या, 2 घड्याळ
1 मंगळसूत्र
85 हजारांची रोख रक्कम लुटारूंनी लुटलीय...
दुसरीकडे समृध्दी महामार्गावर सिन्नर तालुक्यातीलच दुशिंगपूर शिवार भागात एका वाहनचालकाच्या गाडीसमोरही लोखंडी वस्तु फेकत दरोडेखोरांनी अशाच पद्धतीनं लूट केलीय...ही घटनाही रात्री बाराच्या सुमारास घडली.
मात्र दरोडेखोरांची समृद्धीवरची लुटमार फक्त मध्यरात्रीचं सक्रीय असते असं नाही तर.हडस पिंपळगाव टोलनाक्याजवळ भरदिवसा तीन आलिशान गाड्यांमधून आलेल्या 8 ते 10 जणांच्या टोळक्य़ांनी फॉर्च्युनर कारला अडवून उद्योजकाला मारहाण करत अडीच तोळ्याची सोनसाखळी हिसकावून घेतल्याचाही प्रकार घडलाय. गाडीच्या डॅश कॅमेऱ्यात दरोडेखोर आणि त्यांच्या गाडीचा नंबरही कैद झालाय..दरम्यान 27 ऑगस्टलाच नांदेडमधील रहिवासी मोहम्मद फरहान यांच्यासोबतही लुटमारीचा प्रकार घडला...मात्र मोहम्मद फरहान यांनी प्रसंगावधान राखत दरोडेखोरांच्या दिशेने गोळीबार केल्यानं चोरट्यांनी घटनास्थळावरून पळ काढल्याचं समोर आलयं...
समृद्धी महामार्गावर यापूर्वीही अशा प्रकारच्या घटना घडल्या आहेत. 2023 ते 2026 पर्यंत समृद्धीवर तब्बल 15 पेक्षा अधिक लुटमारीच्या घटना घडलेत... त्यामुळे वेगवान प्रवासासाठी ओळखल्या जाणाऱ्या या महामार्गावर रात्रीच्या वेळी वाहन चालवणं आता प्रवाशांसाठी जीवघेणे ठरू लागलयं... महामार्गावर गस्त घालणारी पोलीस यंत्रणा, सीसीटीव्ही कॅमेरे आणि टोल नाक्यांवरील सुरक्षा यंत्रणेपासून दरोडेखोर कसे निसटतात... प्रवाशांची भरदिवसा लुटमार होत असताना पोलीसांची गस्त नसते का.. असा सवाल उपस्थित होतोय... वेळीच समृद्धीवरील दरोडेखोरीच्या य़ा घटना थांबल्या नाहीत तर दरोडेखोरांची समृद्धी अशी नवी ओळख या महामार्गाला मिळेल.....
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.