Samruddhi Highway Accident Saamtv
महाराष्ट्र

Samruddhi Mahamarg Accident: मोठी बातमी! 'समृद्धी' महामार्गावर भीषण अपघात; ३ जणांचा मृत्यू

Jalna Accident News: कारमधील चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार दुभाजकावर जाऊन आदळल्याने हा मोठा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे...

लक्ष्मण सोळुंके

Samruddhi Expressway Accident News: गेल्या काही दिवसांपासून समृद्धी महामार्गावर भीषण अपघातांची मालिका सुरू आहे. आज ( ९, जून) महामार्गावर आणखी एका भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. समृद्धी महामार्गावर मारुती इको दुभाजकाला धडकून झालेल्या अपघातात तीन जण जागीच ठार झाले आहेत. जालना जिल्ह्यातील निधोना गावाजवळ हा अपघात झाला आहे.

याबाबत समोर आलेल्या माहितीनुसार, समृद्धी महामार्गावर (Samruddhi Mahamarg) भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. महा मार्गावर अहमदनगरकडून (Ahmednagar) नागपूरकडे (Nagpur) निघालेल्या कारमधील चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार दुभाजकावर जाऊन आदळली. यामध्ये राणोजी शिवराम तिजारे यांच्यासह दोन महिलां जागीच ठार झाल्या तर एक जण गंभीर झाला आहे.

या अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलिसांनी (Police) घटनास्थळी धाव घेतली. तसेच अपघातात जखमी असलेल्या चौघांना उपचारासाठी जालन्याच्या सामान्य रुग्णालयात दाखल केले. यावेळी उपचारादरम्यान दोन महिलांसह एकाचा मृत्यू झाला असल्याची घोषणा डॉक्टरांनी केली आहे. (Accident News)

हा अपघात इतका भीषण होता की कारचा अक्षरशः चक्काचूर झाला. दरम्यान, अपघातात मृत्यू झालेल्या दोन महिलांचे आडनाव पुरी असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाली आहे. पोलिस या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत. दुर्देवी अपघातात तिघांनी जीव गमावल्यामुळे कुटूंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: अजितदादाचं निवडणूक लढवत आहे, असं समजा... सुनेत्राकाकीसाठी रोहित पवारांची भावनिक पोस्ट

Gaurav More Wedding : हास्यजत्रा फेम गौरव मोरेची बायको आहे तरी कोण?

Tulsi Water For Glowing Skin: सकाळी उठल्यानंतर प्या तुळशीच्या पानांचे पाणी, चेहरा दिसेल तेजस्वी

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आज पोटनिवडणुकीसाठी अर्ज भरणार, काँग्रेसने माघारीसाठी काय अट ठेवली?

High Blood Pressure: BP च्या लक्षणांकडे दुर्लक्ष केल्याने वाढतील हे ४ आजार, डॉक्टरांनी दिली धक्कादायक माहिती

SCROLL FOR NEXT