Samruddhi Expressway Accident News Saam Tv
महाराष्ट्र

Accident News : समृद्धी महामार्गावर भीषण अपघात! ट्रक आणि डिझेल टँकरच्या धडकेत एकाचा मृत्यू

Samruddhi Expressway Accident News : समृद्धी महामार्गावर ट्रक आणि डिझेल टँकरची जोरदार धडक होऊन टँकरला भीषण आग लागली. या दुर्घटनेत टँकर चालकाचा होरपळून मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे.

Alisha Khedekar

  • समृद्धी महामार्गावर ट्रक-टँकरची भीषण धडक

  • डिझेल टँकरला आग; चालकाचा दुर्दैवी मृत्यू

  • ट्रक चालक गंभीर जखमी

  • महामार्गावरील वाहतूक तासभर ठप्प

सचिन बनसोडे, अहिल्यानगर

समृद्धी महामार्गावर मध्यरात्री पुन्हा एकदा भीषण अपघाताची घटना घडली आहे. अहिल्यानगर आणि नाशिक जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या चेनेज 532 जवळ एक ट्रक आणि डिझेल वाहतूक करणाऱ्या टँकरची जोरदार धडक झाली. या भीषण अपघातानंतर डिझेल टँकरने अचानक पेट घेतला. या आगीत टँकर चालकाचा होरपळून दुर्दैवी मृत्यू झाला असून ट्रक चालक गंभीर जखमी झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सदर घटना ही कोपरगाव तालुक्यातील देर्डे आणि सिन्नर तालुक्यातील पाथरे दरम्यान घडली आहे. एक ट्रक आणि डिझेल वाहतूक करणाऱ्या टँकरची जोरदार धडक झाली. ज्यात टँकरमध्ये डिझेल असल्याने आगीने रौद्र रूप धारण केले होते, ज्यामुळे परिसरात मोठ्या स्फोटाचा धोका निर्माण झाला होता.

घटनेची माहिती मिळताच कोपरगाव नगरपरिषद, कोल्हे कारखान्याचे अग्निशमन दल आणि समृद्धी महामार्गाच्या रेस्क्यू पथकाने तातडीने धाव घेतली. अग्निशमन दलाच्या जवानांनी जिवाची बाजी लावून तासाभरात टँकरला लागलेली भिषण आगीवर नियंत्रण मिळवले. या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक सुमारे तासभर पूर्णपणे विस्कळीत झाली होती.

पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली आहे. दरम्यान, टँकरमध्ये चालकाव्यतिरिक्त अजून कोणी होते का? याचा अधिक तपास सिन्नर तालुक्यातील वावी पोलीस करत आहेत. याघटनेने परिसरात तणावपूर्वक वातावरण निर्माण झाले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: खासदार ओमराजे निंबाळकर यांनी घेतली मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट

5 Best Kurti Sets for Women: महिलांसाठी स्टायलिश आणि ट्रेंडी कुर्ती सेट्स, लेटेस्ट 5 डिझाईन्स

October 2026 Bank Holidays : ऑक्टोबरमध्ये 12 दिवस बँका बंद; तुमच्या राज्यात किती दिवस बँका असणार बंद

Sachin Waze: मोठी बातमी! तब्बल साडेपाच वर्षांनी सचिन वाझे येणार तुरुंगाबाहेर; अँटिलिया स्फोटक प्रकरणी जामीन मंजूर

Tukaram Mundhe : पान, गुटख्याची जाहिरात करता तर आधी तुमच्या मुलांना खायला द्या; तुकाराम मुंढे संतापले

SCROLL FOR NEXT