Electric Shock Saam tv
महाराष्ट्र

Electric Shock : विजेचा धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू; तर संगमनेरमध्ये विद्युत तारेला स्पर्श झाल्याने ट्रक चालकाचा मृत्यू

Sambhajinagar Ahmednagar News : छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर तालुक्यातील नांदगाव येथे असलेल्या शेतकऱ्याचा विजेचा धक्का लागल्याने दुर्दैव मृत्यू झाला.

Rajesh Sonwane

रामू ढाकणे/ सचिन बनसोडे 

संभाजीनगर/संगमनेर : पिकांना पाणी देण्यासाठी शेतात जाऊन मोटार चालू करताना विजेचा झटका बसल्याने (Sambhajinagar) शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना वैजापूर तालुक्यातील नांदगाव येथे घडली. तर अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील खांबा वरवंडी शिवारात उसाने भरलेल्या ट्रकला विद्युत तारांचा स्पर्श होऊन चालकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. (Tajya Batmya)

छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर तालुक्यातील नांदगाव येथे असलेल्या शेतकऱ्याचा (Farmer) विजेचा धक्का लागल्याने दुर्दैव मृत्यू झाला. नवनाथ भास्कर कोल्हे असे घटनेतील मृत्यु झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. नवनाथ कोल्हे हे सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास शेतातील मोटर चालू करण्यासाठी गेले होते. मोटर चालू करत असताना अचानक त्यांना विजेचा धक्का (Electric Shock) लागुन ते बेशुद्ध झाले. दरम्यान पुढील उपचारासाठी त्यांना वैजापूरच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केल. याप्रकरणी वैजापूर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

ट्रकचा विद्युत तारेशी संपर्क आल्याने चालकाचा मृत्यू

संगमनेर (अहमदनगर) : ऊसाने भरलेला ट्रक रस्त्याने जात असताना ट्रकचा विद्युत तारेशी संपर्क आला. यामुळे ट्रकमध्ये विद्युत प्रवाह उतरून जोरदार झटका बसल्याने वाहन चालकाचा मृत्यू झाला. सदरची घटना संगमनेर (Sangamner) तालुक्यातील खांबा वरवंडी शिवारात घडली. राहुरी तालुक्यातील म्हैसगाव येथून संगमनेर कारखान्याला ऊस घेऊन जाताना ही घटना घडली असून ट्रकमध्ये करंट उतरल्याने चालक संतोष मोटे यांचा मृत्यू झाला आहे. तर विद्युत प्रवाहामुळे ट्रकला देखील आग लागली होती. विद्युत पुरवठा बंद करत ट्रकला लागलेली आग विझवण्यात यश मिळाले आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुणे- उद्या डॉक्टरांच्या संपाला तात्पुरती स्थगिती

Nagpur : नागपुरमध्ये भीषण अपघात! ई-रिक्षा उलटून महिलेचा मृत्यू, नवऱ्याविरोधात पोलिसांची कारवाई

Lionel Messi: इतिहास रचणाऱ्या लिओनेल मेस्सीला फायनलपूर्वी बसला मोठा धक्का, एम्बाप्पेने एका रात्रीत बदललं सगळं समीकरण

Gold Rate Today India : सोन्याचा भाव पुन्हा घसरला! 7 दिवसांत सोनं इतक्या रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या आजचे ताजे दर

Dal Tadka Recipe : संडे स्पेशल मेन्यू! घरी बनवा ढाबा स्टाईल डाळ तडका, चव अशी की सगळेच रेसिपी विचारतील

SCROLL FOR NEXT