sambhajinagar police booked ambadas danve in adarsh mahila bank nagri sahkari bank saam tv
महाराष्ट्र

Sambhajinagar Adarsh Scam : महिला पतसंस्थेत आर्थिक गैरव्यवहार, 'आदर्श' चे अध्यक्ष अंबादास मानकापेसह 22 जणांवर गुन्हा दाखल

या घोटाळ्यामुळे ठेवीदारांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.

Siddharth Latkar

- Ramu Dhakne

Chhatrapati Sambhaji Nagar News : छत्रपती संभाजीनगर येथील आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेच्या ((adarsh nagari sahakari patsanstha aurangabad) सुमारे 200 कोटींच्या घाेटाळ्यानंतर पतसंस्थेचे अध्यक्ष अंबादास मानकापे (ambadas mankape) यांनी आणखी एक घाेटाळा केल्याचे समाेर आले आहे. मानकापे यांनी आदर्श महिला नागरी सहकारी बँकेतही (adarsh mahila bank nagri sahkari bank aurangabad) उचापती केल्याचे उघडकीस आले आहे. (Maharashtra News)

छत्रपती संभाजीनगरच्या आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेच्या संचालक मंडळावर घाेटाळ्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. यामध्ये ठराविक ठेवीदारांना नियमबाह्य कर्जाची खैरात वाटली असे म्हटलं आहे. आदर्श ग्रुप अंतर्गत येणाऱ्या जवळपास १५ संस्थांना ते वाटप केले. याप्रकरणी अध्यक्ष अंबादास मानकापे याच्यासह 50 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

त्यानंतर मानकापे याच्या दाेन सुनांसह चार जणांना पाेलिसांनी अटक देखील केली हाेती. दरम्यान आदर्श पतसंस्थेच्या कोट्यवधी रुपयाच्या घोटाळ्यानंतर त्या पाठोपाठ आता आदर्श महिला नागरी पतसंस्थेतही घोटाळा झाल्याचे समाेर आले आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

या घोटाळ्याप्रकरणी संचालक अंबादास मानकापेसह 22 जणांवर गुन्हा नाेंद झाला आहे अशी माहिती पाेलिसांनी दिली. मुख्य सूत्रधार अंबादास मानकापे यांनी आदर्श महिला नागरी सहकारी बँकेतही विनाकारण बनावट कर्जाची कागदपत्रे तयार करून आपल्या संस्थांना 48 कोटी रुपयांची कर्ज वितरित केल्याची माहिती समोर आली आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gayatri Datar Wedding: 'तुला पाहते रे' फेम गायत्री दातार अडकली लग्नबंधनात! थाटामाटात पार पडला विवाहसोहळा, VIDEO व्हायरल

Maharashtra News Live Update: नाशिकच्या येवला तालुक्यात मुसळधार पाऊस, कांद्याचं झालं नुकसान

Thane Tourism : शाळेला सुट्टी पडली; लाडक्या मुलांसोबत प्लान करा फॅमिली ट्रिप, फिरा ठाण्यातील 'ही' २ सुंदर हिल स्टेशन्स

Jaljeera Benefits: उन्हळ्यात थंडगार जलजीरा प्यायल्याने शरीराला मिळतात हे ७ फायदे

APY Scheme: केंद्र सरकारची जबरदस्त योजना! २ कप चहाचे पैसे वाचवा अन् ₹५००० पेन्शन मिळवा

SCROLL FOR NEXT