Sambhajinagar Water Scarcity Saam tv
महाराष्ट्र

Sambhajinagar Water Scarcity : टंचाईने वाढली पाण्याच्या टँकरची मागणी; भाव झाले दुप्पट, टँकरसाठी करावी लागतेय वेटिंग

Sambhajinagar News : उन्हाळा सुरू होऊन एकच महिना झाला असून मे महिन्यात येणारे पाण्याचे दुर्भिक्ष या वर्षी एक महिना आधीच जाणवू लागले आहे.

Rajesh Sonwane

रामू ढाकणे 

छत्रपती संभाजीनगर : गेल्या वर्षी समाधानकारक पाऊस न पडल्याने त्याचा परिणाम संभाजीनगरसह (Sambhajinagar) संपूर्ण मराठवाड्यावर झाला आहे. उन्हाची तीव्रता वाढत असताना पाणी टंचाईची (Water Crisis) समस्या देखील गडद होत चालली आहे. त्यामुळे शहर व गावांमध्ये टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. यामुळे टँकरची मागणी वाढली असल्याने त्यांचे दर देखील दुप्पट झाले आहेत.  (Live Marathi News)

उन्हाळा सुरू होऊन एकच महिना झाला असून मे महिन्यात येणारे पाण्याचे दुर्भिक्ष या वर्षी एक महिना आधीच जाणवू लागले आहे. यामुळे एप्रिल महिन्यामध्ये संभाजीनगर शहरावर जलसंकट निर्माण झाले. त्यामुळे खाजगी टँकर धारकांनीही आपले भाव दुप्पट केले असून त्यासाठी देखील मोठी वेटिंग आहे. या परिस्थितीमुळे आता एकीकडे (Water Scarcity) पाणी टंचाई असताना टँकर देखील लवकर उपलब्ध होत नसल्याचे पाहण्यास मिळत आहे. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा) -

जायकवाडीचा पाणीसाठा १७ टक्क्यांवर 

संभाजीनगर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जायकवाडी धरणाचा पाणीसाठा देखील आता १७ टक्केवर आल्याने प्रशासनाने उद्योग आणि सिंचनासाठी लागणाऱ्या पाणी पुरवठ्यामध्ये कपात करण्याच्या हालचाली सुरू केले आहे. तर जुन्या शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या हर्सूल तलावाची देखील भूजल पातळी आता ७.५ फुटापर्यंत घटल्याने तो किती दिवस पुरेल हेही सांगणे आता अशक्य आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Neechbhang Rajyog 2025: आज शुक्र बनवणार शुक्रादित्य नीचभंग राजयोग; 'या' 3 राशींच्या घरी बरसणार पैसा

Maharashtra Live News Update : सांगली-मिरजला पावसाने झोडपले,

Lucky zodiac signs: गुरुवारी रेवती नक्षत्राचा प्रभाव; जाणून घ्या शुभ मूहूर्त, कोणत्या राशींवर बृहस्पतीची कृपा

Solapur : ऐन दिवाळीत दिवाळे! महाराष्ट्रातील या बँकेवर RBI चे कठोर निर्बंध, पैशांचं काय होणार?

Housing Society Elections : गृहनिर्माण सोसायट्यांच्या निवडणूका ऑनलाइन होणार; सरकारनं नेमका काय निर्णय घेतलाय? VIDEO

SCROLL FOR NEXT