Only 10% Water in Marathwada Dam Saam TV
महाराष्ट्र

Marathwada Water Crisis: मराठवाड्यातील ७ धरण कोरडी; उर्वरित धरणातही १० टक्केच पाणीसाठा

Chhatrapati Sambhajinagar News: कमी पावसामुळे राज्यातच पाण्याची भीषण टंचाई जाणवत आहे. अगदी मार्च महिन्यापासून राज्यातील अनेक भागात पाण्यासाठी नागरिकांना भटकंती करावी लागत आहे

डॉ. माधव सावरगावे


छत्रपती संभाजीनगर : यंदाची भीषण पाणी टंचाई वाढतच चालली आहे. त्यात मराठवाड्यात पाण्याची समस्या अधिक गडद असनू आता मराठवाड्यातील पाणी संपण्याच्या मार्गावर आहे. कारण मराठवाड्यातल्या ११ मोठ्या धरणांपैकी ७ धरणं कोरडी पडली आहेत. तर उर्वरित ४ धरणात सरासरी १० टक्के इतका पाणीसाठा शिल्लक आहे. 

कमी पावसामुळे राज्यातच पाण्याची भीषण टंचाई (Water Scarcity) जाणवत आहे. अगदी मार्च महिन्यापासून राज्यातील अनेक भागात पाण्यासाठी नागरिकांना भटकंती करावी लागत आहे. धरणात मुबलक पाणीसाठा नसल्याने तसेच बाष्पीभवनामुळे पाण्याची पातळी आणखी खालावल्याने टंचाई अधिक तीव्र झाली होती. (Marathwada) मराठवाड्याची देखील हीच परिस्थिती असून मराठवाड्यात ११ मोठे धरण असून देखील येथे मोठ्या प्रमाणात पाणी टंचाई जाणवत आहे. आता मराठवाड्यात मोठा पाऊस आल्यावरच ही पाण्याची मोठी अडचण दूर होईल.

चार धरणातही पाणी कमीच 

मराठवाड्यातील ११ धरणांपैकी ७ धरण कोरडे पडले आहेत. तर उर्वरित ४ धरणात सरासरी १० टक्के साठा शिल्लक राहिला आहे. तर मध्यम आणि लघु प्रकल्प पुर्णतः कोरडे ठाक पडले आहेत. त्यातील मृत पाणीसाठा सध्या उपसा केला जात आहे. आजघडीला (Jayakwadi dam) जायकवाडी धरणात ४ टक्के, येलदरी २६ टक्के, पैनगंगा ३० टक्के, विष्णुपरी १६.३ टक्के पाणीसाठा आहे. तर निम्न दुधना, सिद्धेश्वर, माजलगाव, मांजरा, मनार, सिना कोळेगाव, निम्न तेरणा हे प्रकल्प मृत साठ्यात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rahul Gandhi: हाजीर हो! राहुल गांधींच्या अडचणी वाढणार, सावरकरांच्या बदनामी प्रकरणात न्यायालयाचं समन्स

Uddhav Thackeray : मुंबईवर घाला घातला तर हम काटेंगे; उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल,VIDEO

Watch Video: पावले धरती परतीची वाट! अरं 'देवा' भाऊच्या सभेकडे बहिणींनी फिरवली पाठ

Kolhapur Politics : पुरोगामी महाराष्ट्राला काळीमा फासणारा प्रकार; कोल्हापुरात प्रचार पत्रकावर तांदूळ, कापलेला लिंबू, अंगारा

Inflation: महागाई कमी होणार? नेटकऱ्याच्या विनंतीनंतर अर्थमंत्री सीतारामन यांनी दिले मोठे संकेत

SCROLL FOR NEXT