Sambhajinagar News Saam tv
महाराष्ट्र

Assembly Election 2024 : संभाजीनगर जिल्ह्यात मतदानाच्या सुरुवातीला मशीनमध्ये तांत्रिक बिघाड; २८ ठिकाणी बॅलेट युनिट बदलले

Sambhajinagar News : संभाजीनगर जिल्ह्यातील ३ हजार २७३ मतदान केंद्रांवर सकाळी ७ वाजता मतदानाला सुरुवात झाली. जिल्ह्यात एकूण ३२ लाख २ हजार मतदार आज दिवसभरात आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत

डॉ. माधव सावरगावे

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील नऊ विधानसभा मतदारसंघात सकाळी सात वाजता मतदानाला सुरुवात झाली. मात्र मतदानाच्या सुरुवातीलाच काही ठिकाणी बॅलेट युनिट, कंट्रोल युनिट आणि व्हीव्हीपॅट मशीनमध्ये तांत्रिक दोष असल्याचे आढळून आले. यानंतर साधारण २८ ठिकाणी बॅलेट युनिट बदलण्यात आले आहेत. 

संभाजीनगर (Sambhajinagar News) जिल्ह्यातील ३ हजार २७३ मतदान केंद्रांवर सकाळी ७ वाजता मतदानाला सुरुवात झाली. जिल्ह्यात एकूण ३२ लाख २ हजार मतदार आज दिवसभरात आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यासाठी जिल्हा प्रशासनाने सर्व प्रकारची तयारी केली आहे. (Vidhan Sabha Election) तरी देखील जिल्ह्यातील काही ठिकाणी आज मतदान प्रक्रिया सुरू झाली असता ईव्हीएम मशीनमध्ये तांत्रिक बिघाड होत असल्याचे प्रकार आढळून आले. त्यामुळे प्रशासनाने खबरदारी म्हणून लगेचच तेथील आधीच्या ईव्हीएम बदलून राखीव कोट्यातील ईव्हीएम मशीन उपलब्ध करून दिले आहेत. त्यानंतर त्या ठिकाणी मतदान प्रक्रिया शांततेत सुरू झाली. 

पहिल्या दोन तासातच मशीन बदलले 

जिल्ह्यात मतदानाला सुरवात झाल्यानंतर पहिल्या दोन तासात जिल्ह्यात २८ बॅलेट युनिट, १६  कंट्रोल युनिट आणि २९ व्हीव्हीपॅट मशीन बदलण्यात आले आहेत. त्या ठिकाणी काही काळ मतदान प्रक्रिया थांबविण्यात आली होती. मात्र मशीन बदलल्यानंतर मतदानाला सुरवात करण्यात आल्याची माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आली.

प्रशासनाकडून बारकाईने लक्ष 

शहरी भागातील १०० टक्के मतदान केंद्रांवर तर ग्रामीण भागातील ५० टक्के मतदान केंद्रांवर वेबकास्टिंग सुरू आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियंत्रण कक्षातून या मतदान केंद्रांवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे. तिथल्या प्रत्येक हालचाली या नियंत्रण कक्षातून टिपल्या जात आहेत. वेब कास्टिंग होत असलेल्या या प्रत्येक मतदान केंद्रावर प्रत्येकी दोन दोन सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आलेले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking: दुचाकीवरून आले अन् भाजप नेत्यावर झाडल्या गोळ्या, घटनेचा थरार सीसीटीव्हीमध्ये कैद; आरोपी फरार

Savaniee Ravindrra: नाकात नथ, केसात गजरा अन्…; सावनी रवींद्रच्या पहिल्याच वारी सफरच्या अनुभवातील खास क्षण

मुलींनी प्रेमात पडण्याचं योग्य वय काय?

Maharashtra Live News Update: उठेगा नही साला हा डायलॉग ठाकरेंनाच शोभतो - एकनाथ शिंदे

Sushil Kedia Tweet : महाराष्ट्र जोपर्यंत देवेंद्र फडणवीसांच्या हातात आहे, तोपर्यंत...' सुशील केडिया यांचं फडणवीसांना टॅग करत ट्वीट

SCROLL FOR NEXT