Sambhajinagar Saam tv
महाराष्ट्र

Leopard : छ. संभाजीनगरमध्ये सहावा बिबट्या जेरबंद; आणखी एका बिबट्याचा शोध, नागरिकांमध्ये भितीचे वातावरण

Sambhajinagar News : संभाजीनगरच्या सिल्लोड तालुक्यातील सावळद बारा आणि गिरडा घाटात सातत्यानं बिबट्याचं दर्शन होत असते. या भागात बिबट्याने हल्ला करत अनेक वन्य प्राण्यांचा फडशा पडला आहे. वारंवार असे चित्र पाहण्यास मिळत

Rajesh Sonwane

रामू ढाकणे 

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यातल्या गिरडा घाटातून वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी पुन्हा एकदा बिबट्याला जेरबंद केले आहे. गेल्या दोन महिन्यांत हा सहावा बिबट्या पकडला  6वा बिबट्या असून अजून एका बिबट्याचा वन विभागाकडून शोध सुरू आहे.

संभाजीनगरच्या (Sambhajinagar) सिल्लोड तालुक्यातील सावळद बारा आणि गिरडा घाटात सातत्यानं बिबट्याचं दर्शन होत असते. या भागात बिबट्याने हल्ला करत अनेक वन्य प्राण्यांचा फडशा पडला आहे. वारंवार असे चित्र पाहण्यास मिळत असल्याने व बिबट्याचे देखील अनेकदा दर्शन होत असल्याने आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांमध्ये घाबरत पसरलेली होती. अशातच दोन बिबट नागरिकांच्या निदर्शनास पडले होते. यामुळे वन विभागाकडून (Forest department) बिबट्याला पकडण्यासाठी वन विभागाने पिंजरा लावला होता. अखेर एक बिबट्या यात अडकला आहे. 

वन विभागाकडून एका बिबट्याला पकडण्यात यश मिळाले असून आणखी एका बिबट्याचा पकडण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. या भागात वारंवार बिबट येत असल्याने दहशतीचे वातावरण निर्माण झाले. त्यामुळं शेतकरी शेतात जातांना घाबरत आहे. शिवाय शाळकरी मुले देखील मोठया व्यक्तीच्या सरक्षणातच शाळा गाठत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jio Prepaid Plan: खुशखबर! 200GB डेटा आणि 90 दिवसांची वैधता अन्...; Jio युजर्ससाठी 'ही' खास ऑफर माहितीये का?

Accident News : कल्याणमध्ये अपघाताचा थरार! रिंग रोड बनला स्टंटबाजांचा अड्डा, भरधाव कार व्यवसायिकाला धडकली

Maharashtra Live News Update: संत गाडगे महाराज यांच्या 150 व्या जयंती दिनी त्यांच्या पुतळ्याचे पालिका आवारात करण्यात आले भूमिपूजन

करोडपती बनायचंय मग PPF मध्ये करा गुंतवणूक; आयुष्यभर दरमहा मिळतील 61,500 पेन्शन

Viral Video: जगातील सर्वात सुंदर व्हिडिओ, मुलाने पहिल्यांदा विमानात बसवलं; माऊलीच्या डोळ्यांतून वाहू लागले सुखाचे अश्रू

SCROLL FOR NEXT