Samruddhi Mahamarg Saam tv
महाराष्ट्र

Samruddhi Mahamarg: अपघात रोखण्यासाठी ऑडिओ क्लिपद्वारे चालकांना देणार सूचना; चालकाला झोप लागू नये म्‍हणून रंम्बलस्ट्रीप

चालकाला झोप लागू नये म्‍हणून रंम्बलस्ट्रीप; अपघात रोखण्यासाठी ऑडिओ क्लिपद्वारे चालकांना देणार सूचना

साम टिव्ही ब्युरो

नवनीत तापडीया

छ्त्रपती संभाजीनगर : वाहन चालकाला झोप लागल्यामुळे समृद्धी महामार्गावरील (Samruddhi Mahamarg) बहुतांश अपघात (Accident) झाल्याचा दावा महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने केला आहे. चालकांची झोप उडवण्यासाठी ‘एमएसआरडीसी’ने प्रत्येक २५ किलोमीटरवर रंबलस्ट्रीप लावण्यास सुरुवात केली आहे. (Maharashtra News)

समृद्धी महामार्गावरील गंगापूर, वैजापूर तालुक्याच्या हद्दीत हे काम सुरू झाले आहे. रात्री पुलावरील कठडे दिसावेत, म्हणून रेडियम स्ट्रिप लावण्यात येत आहेत. प्रत्येक पाच किलोमीटर अंतरावर रंगीबेरंगी झेंडे बसवले जात आहेत. महामार्गावर वाहने कशी चालवावी; यावर टोल नाक्यावर चालकांना ऑडिओ क्लिपच्या माध्यमातून सूचना देण्यात येणार आहेत. रंबल स्ट्रिप अपघात रोखण्यासाठी मोठा फायदा होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

रंबलस्ट्रीप म्हणजे काय?

रंबलस्ट्रीप म्हणजे महामार्गावर छोट्या पट्ट्यांच्या स्पीड ब्रेकरची एक श्रृंखला तयार करण्यात येते. त्यांना रंबलस्ट्रीप म्हणतात या स्ट्रीपवरून वाहन गेल्यावर कंपनासारखा गडगडणारा आवाज ऐकू येतो, चालकाला सावध करण्यासाठी रंबल स्ट्रीटचा वापर होतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मेडिकल स्टोरमधून औषधं घेताय? सावधान ! दैनंदिन वापरातील 157 औषधं धोकादायक?

जीवघेणे मॅनहोल बीएमसीची पोलखोल; महापौरांसमोरच कर्मचारी मॅनहोलमध्ये पडला

हॉटेलवाल्यांनो ! व्हेज-नॉनव्हेज वेगवेगळं ठेवा; किचन कसं असावं? तुकाराम मुंढेंनी सांगितले हॉटेलचे नवे नियम

Pune Ketan Agrawal Death Case: केतन अग्रवालचा जीव वाचला असता; आधीच संशय आला होता, पण..

Pune Crime: 2000 फोन कॉल, 238 तास चर्चा आणि 3 प्लॅन; पुण्याच्या कॅफेत रचला केतनच्या हत्येचा कट, वाचा इनसाईड स्टोरी

SCROLL FOR NEXT