Accident News Saam tv
महाराष्ट्र

Accident News : पंक्चर कार बाजूला घेताना वाहनाची धडक; दोघांचा जागीच मृत्यू, समृद्धी महामार्गावरील भीषण दुर्घटना

Sambhajinagar News : समृद्धी महामार्गावरून जात असताना कारचे टायर पंक्चर झाल्याने कार बाजूला उभी केली. रस्त्याच्या बाजूला उभे असतानाच ट्रकने धडक दिली. यात कार चालकासह मदतीसाठी आलेल्या शेतकऱ्याचाही मृत्यू झाला

डॉ. माधव सावरगावे

छत्रपती संभाजीनगर : समृद्धी महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच आहे. यात आणखी एक अपघाताची घटना घडली असून यात समृद्धी महामार्गावरून जात असताना कारचे टायर पंक्चर झाले. यामुळे कार बाजूला घेणाऱ्या दोन जणांना अज्ञात वाहनाने धडक देत उडविले. यात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर एकजण गंभीर जखमी आहे. 

समृद्धी महामार्गावर जयपूर शिवारात सदरची घटना घडली आहे. या अपघातात कार चालक योगेश दत्तात्रय घाटेकर (वय ३८, केळगाव, ता. निफाड, जि. नाशिक) व शेतकरी देविदास नाना मते (वय ६०, रा. जयपूर, ता. छत्रपती संभाजीनगर) हे दोघे ठार झाले आहेत. तर बाळू विश्वनाथ घाटेकर (वय ६०, राकेळगाव, ता. निफाड, जि. नाशिक) हे गंभीर जखमी झाले. जोरदार धडक दिल्यानंतर संबंधित वाहनधारक गाडी घेऊन फरार झाला आहे. 

दरम्यान योगेश घाटेकर हे कारने समृद्धी महामार्गाने निफाडहून रेशीम विक्रीसाठी जालना येथे जात होते. त्यांच्यासोबत बाळू घाटेकर हे देखील होते. प्रवासादरम्यान समृद्धी महामार्गावर जयपूर शिवारात कारचे एक टायर पंक्चर झाले होते. यामुळे त्यांनी ती महामार्गाच्या बाजूला उभी केली. या वेळी त्यांनी मार्गालगत असलेल्या शेतात काम करीत असलेले शेतकरी देविदास मते हे त्यांच्या मदतीसाठी धावले. 

कारजवळ उभे असताना ट्रकची धडक 

तिघे जण कारच्या बाजूला उभे असताना याच दरम्यान छत्रपती संभाजीनगरकडून येणाऱ्या भरधाव आयशर ट्रक चालकाने तिघांना जोराची धडक देत उडविले. या अपघातात कार चालक घाटेकर आणि मदतीला आलेले शेतकरी मते या दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर गाडीत सोबत असलेले बाळू घाटेकर हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ganeshotsav : यंदाचा गणेशोत्सव १० किंवा ११ नाही तर थेट १२ दिवसांचा! 'हे' कारण समोर; पंचांगकर्त्यांचा मोठा खुलासा

Maharashtra News Live Update: पंढरपुरात भाविकांची गर्दी; दर्शनाची रांग गोपाळपूर रोडपर्यंत

Mumbai Crime: मुंबई हादरली! बायको अन् २ मुलांची हत्या, नंतर नौदल कर्मचाऱ्याने संपवलं आयुष्य

Monday Horoscope : सोमवारपासून ४ राशींचं नशीब सोन्यासारखं चमकणार; तुमची रास तर यात आहे का? एका क्लिकवर जाणून घ्या

Kalakand Recipe : ना मावा, ना साखर... तरीही इतका टेस्टी 'कलाकंद' कसा बनवला? श्रावण सोमवारसाठी १ नंबर रेसिपी

SCROLL FOR NEXT